धुळे : महापालिका प्रशासनाकडून एकीकडे स्वच्छ सव्रेक्षण 2017 अंतर्गत स्वच्छतेवर भर दिला जात असताना दुसरीकडे शहरातील कचरा संकलन करण्यासाठी तिस:यांदा काढण्यात आलेल्या निविदा बारगळण्याची चिन्हे असल्याची माहिती मनपा सूत्रांकडून देण्यात आली़ वरिष्ठ अधिका:यांकडून एकमेकांकडे बोट दाखविले जात असले तरी याकामी नेमके काय अडथळे आहेत हे स्पष्ट झालेले नसल्याने निविदांचाच ‘कचरा’ होत आह़ेदोन वेळा प्रक्रिया रद्दशहरात कचरा संकलनाचा विषय पहिल्यापासूनच सातत्याने वादग्रस्त ठरला आह़े त्यामुळे मनपाचे तत्कालीन आयुक्त दौलतखाँ पठाण यांनी शहराचे चार भाग करून वेगवेगळे ठेके देण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार 2012 मध्ये चार भागांसाठी पहिल्यांदा निविदा मागविण्यात आल्या़ मात्र एकाच ठेकेदाराने वेगवेगळ्या नावाने निविदा भरल्याचे समोर आल्याने ठेका प्रक्रिया रद्द करण्यात आली होती़ त्यानंतर पठाण यांचे निलंबन झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती़ त्यानंतर मागील वर्षी तत्कालीन आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी कचरा संकलनाचा विषय अजेंडय़ावर घेतला. मात्र त्या वेळी डॉ़ भोसले यांनी 5 वर्षाच्या अनुभवाची अट निविदेत टाकल्याने स्थायीच्या सभेत या अटीला विरोध झाला़ अखेर अट बदलून तीन वर्षे करण्यात आली व निविदा मागविण्यात आल्या़ परंतु त्या वेळी निविदा भरणा:या तीनपैकी दोन ठेकेदारांनी अपूर्ण कागदपत्रे सादर केल्याचे समोर आल्याने मुख्य लेखापरीक्षकांनी ही निविदा प्रक्रिया बाद ठरवली होती़ तिस:यांदाही अडथळे कायमदरम्यान, नोव्हेंबर महिन्यात तिस:यांदा शहरातील चार भागांसाठी कचरा संकलनाच्या निविदा मागविण्यात आल्या़ तीन भागांसाठी प्रत्येकी तीन व एका भागासाठी दोन निविदा प्राप्तदेखील झाल्या़ मात्र निविदा भरणा:या ठेकेदारांबाबतच तक्रारी झाल्या आहेत़ त्याचप्रमाणे अनेकांचा या निविदा प्रक्रियेत प्रमाणापेक्षा अधिक हस्तक्षेप असल्याने अधिका:यांकडून कचरा संकलनाबाबत एकमेकांकडे बोट दाखविले जात आह़े एवढेच नव्हे तर आयुक्तांनीच निविदा प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिल्याचीही चर्चा आह़े दरम्यान, एकीकडे स्वच्छ सव्रेक्षण 2017 अंतर्गत स्वच्छता, हगणदरीमुक्तीसह विविध उपक्रम राबविले जात असताना दुसरीकडे शहरातील कचरा संकलनाचा प्रश्न मार्गी लागताना दिसत नाही़ सध्या शहरातील कचरा संकलनाबाबत अनेक तक्रारी असून, घंटागाडी नियमित येत नसल्याची प्रमुख तक्रार आह़े स्वच्छ सव्रेक्षणांतर्गत होत असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्राची समिती 20 ते 25 जानेवारीदरम्यान येणार असून स्वच्छ सव्रेक्षणात कचरा संकलनावर भर देणे अपरिहार्य आह़े कचरा संकलनाचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे कचराकुंडय़ादेखील ओसांडून वाहत असल्याचे दिसून येत़े
कचरा संकलनाच्या निविदेचाच ‘कचरा’!
By admin | Published: January 05, 2017 11:21 PM