साक्री : आज आधुनिक युगात रासायनिकतेचा वापर आणि वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे वनस्पतींमधील पोषण व्यवस्थे संबंधातील समस्या वाढू लागली आहे. याचे कारण जमीन शक्तिहीन झालेली आहे. अशा परिस्थितीत शक्तिहीन जमिनीला शक्तिशाली बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड गरजेची असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब इंगोले यांनी शुक्रवारी येथे केले.शहरातील अंबापुर रोडलगत असणाऱ्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत योग शेती या विषयावर व्याख्यान आणि योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेविका अॅड.पूनम शिंदे-काकुस्ते यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब इंगोले कोल्हापूर, नेत्ररोग तज्ञ मल्हार देशपांडे मालेगाव, प्रभागाच्या नगरसेविका अॅड. शिंदे-काकुस्ते, प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रमुख प्रचारक शीला दिदी उपस्थित होते.तालुक्यासह शहरातील बहुतांश साधक, साधिका शेतीशी संबंधित असल्याने योग केवळ मानवी शरीरालाच बरे करतो असे नव्हे, तर तो शेतातील पिकांनाही रोगराईमुक्त ठेवण्यात योगदान देतो. त्यामुळे शेतीसाठी उपयोगी असणाºया योगाचे महत्व सर्वांपर्यंत पोहचावे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे शीला दीदी म्हणाल्या. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाकडे तालुकाभरातून रोज साधक येतात. मात्र गेल्या अनेक वर्र्षांपासून शहरातून अंबापुर गावाकडे जाणाºया या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली होती. मागणी करूनही प्रश्न निकाली निघत नव्हता. परंतु दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करून नागरिकांसह साधकांना आणि अंबापूरच्या ग्रामस्थांना रस्त्याची सोय करून दिल्याबद्दल प्रभागाच्या नगरसेविका अॅड. शिंदे- काकुस्ते यांचा शीला दीदी यांनी सत्कार करून त्यांच्या कामाचे कौतुक केले. याप्रसंगी डॉ मल्हार देशपांडे यांनीही योगाचे महत्व विशद करीत प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमासाठी साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जमीन शक्तिशाली बनण्यासाठी वृक्षलागवड गरजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:53 PM