रांझणी, जि.नंदुरबार, दि.11- विठ्ठल मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या तळोदा तालुक्यातील रांझणी येथील ग्रामस्थांनी खर्चिक कार्यक्रमांना फाटा देत, त्याऐवजी जनजागृती करण्याबाबत आदर्श निर्णय घेतला आह़े गावातील ज्येष्ठांनी दिलेल्या निर्णयाची अमंलबजावणी सुरू झाली आह़े
गावागावात सध्या उत्तरक्रिया विधी, विवाह सोहळे, साखरपुडा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आह़े यासाठी मोठा खर्च केला जातो़ या खर्चावर आळा बसून जनजागृती व्हावी यासाठी रांझणी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या पुढाकाराने साखरपुडा कार्यक्रमादरम्यान चहापाणी आणि उत्तरकार्यात वायफळ खर्चाना फाटा देऊन किर्तन किंवा इतर सामाजिक कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्याचा निर्धार करण्यात आला आह़े यामुळे गेल्या महिनाभरापासून रांझणी गावातील विविध कार्यक्रमांत ग्रामस्थ सहभाग बाहेरून येणा:यांना निर्णयांची माहिती देऊन अंमलबजावणी करण्यास सांगत आहेत़ गावातील एकनाथ दगाजी मराठे यांचे सुपूत्र अविनाश यांच्या साखरपुडय़ाचा कार्यक्रम तळवे ता़ तळोदा येथे आयोजित करण्यात आला होता़ याठिकाणी वराचे काका वसंत मराठे यांनी पुढाकार घेत गावाच्या निर्णयाची माहिती दिली़ यामुळे येथे केवळ चहापान करण्यात येऊन खानपानाच्या खर्चावर बंधने घालण्यात आली़
त्याचप्रमाणे रांझणी गावातील ईश्वर मराठे यांच्या वडिलांच्या निधनानंतर उत्तरक्रिया कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी ह़भ़प जिवराज महाराज कापडणेकर यांच्या किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत़े
तसेच गावात लिंबा नामदेव गवळी यांच्या मुलाच्या विवाहप्रसंगी त्यांचे बंधू दीपक मराठे व युवकांच्या सहकार्याने सकाळी 10. 40 वाजता विवाहसोहळा उरकण्यात आला होता़ दुपारी एक वाजेर्पयत हा विवाह सोहळा पार पाडला होता़ तसेच गावातील प्रविण भटाजी कदम यांच्या कन्येच्या विवाहनिमित्ताने हळदीच्या दिवशी महामंडलेश्वर रामानंदपुरी महाराज यांचे प्रवचन झाल़े
विशेष बाब म्हणजे गेल्या महिनाभरापासून गावात सर्वधर्मियांचे विवाह सोहळे हे निर्धारित वेळेवरच होते असल्याची माहिती देण्यात आली आह़े यापुढेही गावात अशाप्रकारचे आदर्श उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े