लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : धुळे जिल्ह्यातील धर्मा मंगा पाटील या ८० वर्षीय शेतकºयाने सोमवारी विष पिऊन मुंबई येथे मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने या शेतकºयाला जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात शेतकºयावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पाटील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील मूळ रहिवासी आहेत. धुळे जिल्ह्यात होणाºया औष्णिक वीज प्रकल्पासाठी पाटील यांची पाच एकर बागायती जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकर जमिनीच्या मोबदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. त्यांच्या शेजारी असलेल्या शेतकºयास ७४ आर जमिनीचा मोबदला म्हणून १ कोटी ९५ लाख रुपयांची भरपाई मिळालेली आहे. दोघांची फळबागायत असताना एवढा फरक कसा? त्यामुळे कमी भरपाई मिळाल्याने धर्मा पाटील यांनी गेले तीन महिन्यांपासून अधिकाºयांकडे पाठपुरावा सुरू केला होता. मात्र त्यांना अपेक्षित भरपाई लवकर मिळू न शकल्याने त्यांनी हा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे. ते मुंबईत या संदर्भात होणाºया बैठकीसाठी आले होते. परंतु बैठक रद्द झाल्याचे सांगितले जात आहे.
धुळे जिल्ह्यातील विखरणच्या शेतकºयाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:20 PM
प्रकृती अत्यवस्थ : सेंट जॉर्ज रूग्णालयात उपचार सुरू
ठळक मुद्देफळबागायत असताना तुटपुंजा मोबदलाअधिकाºयांकडे पाठपुरावा करूनही न्याय मिळाला नाहीआत्महत्येच्या प्रयत्नानंतर प्रकृती गंभीर, सेंट जॉर्ज रूग्णालयात उपचार सुरू