लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहराची लाईफ- लाईन म्हणुन ओळख असलेल्या टॅक्सी व रिक्षांना २० वर्षाची वयोमर्यादा सरकारने लागु केली आहे़ त्यामुळे आता २० वर्षापुढील टॅक्सी व रिक्षा वाहणांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण करू नये, असा आदेश प्रादेशिक विभागाने घेतल्यामुळे आता शहरातील टॅक्सी व रिक्षा चालकांना नवीन वर्षात संकटाला सामोरे जावे लागू शकते़ राज्य परिवहन प्राधिकरण विभागाने २९ एप्रिल २०१३ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील टॅक्सी वाहन मिटर्ड टॅक्सी मुळ नोदणीच्या दिनांकापासुन २० वर्षानंतर व आटोरिक्षा १६ वर्षानंतर परवान्यावरून उतविण्याकरीता १ सप्टेंबर २०१३ पासुन अशा वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची नुतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे़ तर सध्या योग्यता प्रमाणपत्र असलेल्या वाहनांना शेवटची संधी राहणार आहे़ जिल्ह्यात १५ हजार टॅक्सी व रिक्षा वाहनांची नोंद-जिल्ह्यात १० ते १२ हजार ट्रॅक्सी वाहनांची नोंद टॅक्सी संघटनेत करण्यात आली आहे़ धुळे, दोंडाईचा, अमळनेर, पारोळा, मालेगाव, शिरपूर, नाशिक या मार्गावरून चालतात़ तर शहरात लाईफ-लाईन म्हणुन ओळख असलेल्या रिक्षांची संख्या सुमारे ५ हजार आहेत़ त्यापैकी ३ हजार रिक्षा जुन्या आहेत़ नव्या ५०० रिक्षांना मिटर परवाना आहेत़ जिल्ह्याबाहेरील वाहने जुनी व त्यांची वयोमर्यादा पार झाली आहे़ त्यामुळे अशा वाहन चालकांना आता सरकारच्या नियमानुसार अमंजबजावणी करावी लागणार आहे़ अन्यथा टॅक्सी व आटोरिक्षा चालक येणार अडचणीत-नागरिकांना प्रवास भाडे नियमानुसार आकारले जावे, यासाठी ट्रॅक्सी व आटोरिक्षांना मिटर परवाना सक्तीचा केला आहे़ तर वाहनांची वयोमर्यादा देखील निश्चित केली आहे़ त्यामुळे त्यामुळे टॅक्सी व रिक्षा चालकांना जुनी वाहणे घेतांना वयोमर्यादा, परवाणा तपासणी करावी लागणार आहे़ त्यामुळे नव्या वर्षात वाहनांची वयोमर्यादा पार करण्याºया चालकांना सरकारचे आर्थिक ग्रहण लागणार आहे़जिल्ह्यातील टॅक्सी, आटोरिक्षांना मालेगाव, नाशिक परवाना-मालेगाव, ओझर, नाशिक येथुन वाहनांची मोठ्या प्रमाण खरेदी-व्रिकी होते़ त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात या शहरातील परवाना असेलेली वाहन आहेत़ मात्र अपघातावर नियत्रंण मिळविण्यासाठी वयोमर्यादा, फिटनेस प्रमाणपत्राच्या अटीमुळे जुनी वाहन घेतांना अडचणीला सामना करावा लागणार आहे़ सरकारच्या निर्णयाचा संघटनांकडून विरोध-कमी भांडवलमध्ये व्यवसाय होत असल्याने टॅक्सी व रिक्षा व्यवसाय केला जातो़ मात्र बरीच वाहने जुुनी झाल्यामुळे वाहनचालकांना नव्याने वाहने घेण्यासाठी भांडवल नसल्याने सरकारचा निर्णयामुळे त्यांना उपासमारी सामोरे जावे लागणार असल्याने या निर्णयाचा विरोध होत आहे़ इन कॅमेरा सर्वच वाहनांची तपासणी गरजेची- परिवहन विभागाने वाहणाची योग्यता प्रमाणपत्र देण्याच्या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये योग्यता प्रमाणपत्र देण्यात येणाºया वाहनांची तपासणी करताना व्हिडिओ शूटिंगव्दारे केली जाते़ गाड्यांचे फिटनेस सर्टिफिकेट (योग्यता प्रमाणपत्र) देण्याची प्रक्रिया कडक झाली आहे
नवीन वर्षात टॅक्सी-रिक्षाचालकांपुढे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 11:03 PM