लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंंबई-आग्रा महामार्गावरील सरवड फाट्याजवळ चुकीच्या दिशेने येणाºया ट्रकने दुचाकीला धडक दिली़ यात दीर आणि भावजायीचा करुण अंत झाला़ तर, दोन वर्षाचा चिमुरडा सुदैवाने बचावला़ ही घटना सोमवारी दुपारी घडली़ शिंदखेडा तालुक्यातील सुराय येथील दिनेश रामचंद्र पाटील (२८) आणि त्याची वहिनी वर्षाबाई कल्पेश पाटील (२५) हे त्याचा पुतण्या शिव कल्पेश पाटील (२) याला घेवून आरजे ३६ एसएन २६५६ क्रमांकाच्या दुचाकीने सोनगीरकडून धुळ्याकडे येत होते़ पुतण्या शिव हा आजारी असल्याने त्याला रुग्णालयात दाखविण्यासाठी हे तिघे धुळ्याकडे येत होते़ त्याचवेळी सरवड फाट्यावर पेट्रोल भरुन विरुध्द दिशेने रस्त्यावर आलेल्या एमपी ०९ एक्सएक्स १४७२ या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली़ या अपघातात दिनेश पाटील आणि वर्षाबाई पाटील हे दोघे जागीच ठार झाले़ दोन वर्षाचा शिव मात्र सुदैवाने बचावला़ त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ या घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले़ घटनास्थळावरुन ट्रक चालक आणि सहचालक पसार झाले आहेत़ घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती़ परिणामी वाहतूक बराचकाळ विस्कळीत झाली़ धनराज दगाजी पाटील (रा. सुराये ता. शिंदखेडा) यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ ट्रकचालकाविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली़
धुळ्यानजिक महामार्गावर ट्रक-दुचाकी अपघात, दीर-भावजायीचा अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 5:32 PM
सरवड फाटा : सुदैवाने बालक बचावला
ठळक मुद्देमुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सरवड फाट्याजवळील घटनाट्रकच्या धडकेत दीर-भावजायीचा अंत, दोन वर्षाचा बालक बचावलापाहणाºयांच्या गर्दीमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत