लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या पथकाने चाळीसगाव रोड आणि मोहाडी परिसरात कारवाई करुन गुरे आणि गोमांस वाहून नेणारा ट्रक असे दोन्ही कारवाई मिळून सुमारे ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली़ मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग टोलनाक्याजवळ एमएच ०६ एबी ७८६१ या क्रमांकाचा ट्रक अडविण्यात आला़ ट्रकचालक शेख जमील हाजी अब्दुल रहिम (रा़ इस्लामपुरा, अन्सार चौक, मालेगाव), मुज्जमील इब्राहीम खान (रा़ कमालपुरा, मालेगाव) हे दोघे गो-मांस घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या तपासणीतून समोर आले़ पोलिसांनी तपासणी केली असता ट्रकमध्ये मांसाचे लहान-मोठे तुकडे आढळून आले़ जप्त केलेला ट्रक आणि गोमांस एकूण १० लाख रुपये किंमतीचे आहे़ ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल राजपूत, प्रेमराज पाटील, जोएब पठाण, कबीर शेख यांनी केली़महामार्गावर दुसरी कारवाई-दुसरी कारवाई चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली़ चाळीसगाव चौफुलीवर एमएच ०४ सीयू ८१३७ आणि एमएच ०६ एजी ३९८६ या दोन्ही वाहनांच्या चालकांना वाहनांमधील ८ बैलांविषयी विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली़ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले़ चंद्रकांत जनार्दन मोहिते (रा़ सत्यसाईबाबा नगर, साक्री रोड, धुळे) असे वाहन चालकाचे नाव आहे़ याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़ ही कारवाई पोलीस निरीक्षक कुबेर चवरे, प्रल्हाद वाघ, मुक्तार मन्सुरी, योगेश चव्हाण, शंकर महाजन, संदिप कढरे, प्रेमराज पाटील, सुशील शेंडे या पथकाने केली़
गोमांससह गुरांचा ट्रक पोलिसांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:09 PM