दोंडाईचा (धुळे) : सेंट्रल बॅँक ऑफ इंडियाच्या दोंडाईचा येथील शाखेचे एटीएम मशीन अज्ञात चोरटय़ाकडून फोडण्याचा प्रय} शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झाला. परंतु, तत्काळ नाशिक येथील सेंट्रल बॅँक ऑफ इंडियाच्या सुरक्षा यंत्रणेने यासंदर्भात दोंडाईचा येथील शाखाधिका:यांना माहिती दिल्याने चोरी टळली. एटीएम मशीनमध्ये संबंधित चोरटय़ाची छबी कैद झाली आहे. चोरटय़ाने एटीएमचे शटर वर ओढून आत प्रवेश केला व तेथील कॅमे:याची दिशा बदलून चोरीचा प्रय} केला. नाशिकहून ‘अलर्ट’ आणि प्रशासन घटनास्थळीएटीएम मशीनमधील सीसीटीव्ही कॅमे:याची लिंक थेट नाशिक येथील सेंट्रल बॅँकेशी जोडली आहे. चोरीची माहिती मिळाल्यानंतर नाशिकच्या प्रशासनाने तत्काळ दोंडाईचा शाखा व्यवस्थापक विकासकुमार सिंग यांना माहिती दिली. नंतर सिंग यांच्यासोबत शाखाधिकारी जितेंद्र धाकड, अजरुन सोनवणे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक संतोष इंगळे व पथकाने घटनास्थळ गाठले.
एटीएम फोडण्याचा प्रय} फसला
By admin | Published: January 28, 2017 12:37 AM