शिरपूर : अंगणात लहान मुलाच्या अंघोळीचे पाणी आल्याने १२ जणांनी महिलेला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना ९ रोजी सकाळी ११.३० वाजता तालुक्यातील नवे भामपूर येथे घडली. याप्रकरणी १२ जणांविरूद्ध शिरपूर शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अश्विनी सुभाष कोळी (२७, रा. नवे भामपूर) या ९ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास मुलगा कल्पेश (वय २-वर्ष) याला अंगणात अंघोळ घालत होत्या. अंघोळीचे पाणी शेजारी राहणारे प्रल्हाद संपत कोळी यांच्या अंगणात गेले. त्यावरून प्रल्हाद कोळी व त्यांचे परिवारातील लोकांनी भांडणशस सुरूवात केले. तेव्हा फिर्यादीचे पती भांडण सोडविण्यास आले असता, त्यांनाही संशयित आरोपींनी काठ्या, सळईने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तर यावेळी सरलाबाई कोळी व अक्काबाई कोळी यांनी अश्विनी कोळी यांना धरून ठेवले. तर योगिताबाई कोळी हिने घरातून पेट्रोल आणून ते अश्विनीच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले. या घटनेत अश्विनी कोळी ४० टक्के भाजली आहे. दोघ पती-पत्नीला जिल्हा रूग्णालयात उपचाासाठी दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी अश्विनी कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रल्हाद संपत कोळी, सरलाबाई रमेश कोळी, आक्काबाई कोळी, योगिताबाई रमेश कोळी, राकेश रमेश कोळी, अनिल कांतीलाल कोळी, धनराज प्रल्हाद कोळी, आधार रोहिदास कोळी, निर्मलबाई प्रल्हाद कोळी, राहुल कोळी, अंजूबाई कांतीलाल कोळी, क्रांतीबाई कांतीलाल कोळी यांच्याविरूद्ध शिरपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक एस.बी.आहेर हे करीत आहेत. दरम्यान यातील एकाही संशयिताला ताब्यात घेतलेले नाही.दरम्यान, क्षुल्लक कारणावरुन घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर होत आहेत़ त्याकडे वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे़ वेळोवेळी अशा प्रकारचे वाद उद्भवल्यानंतर संबंधितांचे योग्य पध्दतीने समुपदेशन झाले पाहीजे़ असे झाल्यास घडणाºया घटनांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकेल़
महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:23 PM