ऑनलाईन लोकमत
शिरपूर,दि.11 : देशात इंग्रजांनी 150 वर्षे राज्य केले, त्यांनीदेखील या देशाला जेवढे लुटले नाही त्यापेक्षा जास्त गेल्या 70 वर्षात काँग्रेसने लुटले आह़े भाजपा सरकार हे शेतक:यांच्या कजर्माफीसाठी सकारात्मक तर आहेच परंतु शेतकरी हा कजर्मुक्त कसा होईल यासाठीही प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन देशाचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे केले.
शिरपूर शहरातील करवंद नाक्याजवळील शंकर माळी मंगल कार्यालयात ‘सबका साथ सबका विकास’ या संमेलन रविवारी झाले. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल होत़े यावेळी खासदार डॉ. हीना गावीत, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, किविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर होत़े
मनमाड-इंदौर रेल्वे मार्गाचे लवकरच भूमीपूजन
मनमाड-इंदौर रेल्वे मार्गाचा प्रश्न गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित होता़ त्यास मोदी सरकारने मंजुरी दिली. त्यासाठी 10 हजार कोटींची तरतुद करण्यात आली असून लवकरच भूमिपूजन केले जाईल़ या रेल्वेमार्गामुळे शिरपूर सेंट्रल हब सीटी बनेल, असे मंत्री डॉ. भामरे म्हणाले.
पर्यटन विकास व रोहयो मंत्री जयकुमार रावल म्हणाले, की शेतक:यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने हस्तक्षेप केल्याने हे आंदोलन वेगळे वळण घेत आह़े
खासदार डॉ. हीना गावीत म्हणाल्या, की अंकलेश्वर-बु:हाणपूर हा राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर करण्यात आला असून त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. लवकरच त्या कामाला सुरूवात केली जाणार आह़े आदिवासी मुला-मुलींसाठी वसतीगृह मंजूर केले आह़े