धुळे : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता येण्यासाठी रेशन दुकानांमध्ये ग्राहकांसाठी सूचना फलक लावण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यंत्रणेने राज्यभरातील पुरवठा विभागा दिले आहेत़ मात्र जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये सूचना फलकच दिसत नसून त्याकडे सर्रास कानाडोळा केला जात आहे़सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत पात्र रेशनकार्ड धारकांना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. यामध्ये पारदर्शकता राहावी, याकरीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार अन्नधान्याची निधारीत केलेली किंमत, त्याचे प्रमाणाबाबत माहिती असलेला फलक प्रत्येक रेशन दुकानांमध्ये प्रदर्शित करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत़ लाभार्थीना वितरित करण्यात येणाऱ्या अन्नधान्याचे प्रमाण, किरकोळ विक्रीचे मुल्य, अन्नधान्याची पात्रता, रेशन दुकाने उघडणे व बंद करण्याची वेळ, भोजनाची वेळ तसेच अन्नधान्याचा दर्जा आणि प्रमाण आदींबाबत काही तक्रारी असल्यास त्या कोणत्या अधिकाऱ्यांकडे कराव्यात,त्याचबरोबरच तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक, हेल्पलाईन क्रमांक आदींची माहिती असणारा फलक रेशन दुकानांमध्ये सर्वांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावण्यात आदेश केले आहे़ मात्र या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात आहे़शासनाने रेशन दुकानांमध्ये सूचना फलक लावण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यंत्रणेने पुरवठा विभागाला दिले आहेत़ मात्र असे असतांना देखील जिल्ह्यात बहूसंख्ये रेशनदुकानात दुकानाची वेळ, वस्तुच्या किमती, सूचना फलक लावण्यात आलेले नाही़ रेशनकार्ड धारकाला दुकानदाराच्या नियम व वेळेनुसार धान्य घ्यावे लागते़ जिल्हा पुरवठा विभागाकडून शासनाकडून देण्यात येणाºया सवलतीच्या दरातील धान्य नियमानुसार दिले जाते का? तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्याची गरज असतांनाही जिल्हा पुरवठा विभागाकडून सर्रासपणे शासन निर्णयाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट होत आहे़पारदर्शता येण्याची गरज जिल्ह्यात रेशनकार्डधारकांना बायोमेट्रिक पध्दतीने धान्य वितरण केले जात आहे़ यामुळे धान्यवितरण प्रणालीत पारदर्शकता आली आहे़ मात्र जिल्ह्यातील बहूसंख्य रेशनदुकानात ग्राहकांचे हक्क, नियम, धान्याचे भाव, तक्रारीसाठी संपर्क याबाबत ग्राहकांना अंधारात ठेवले जाते़ तर धान्य घेतल्याची ग्राहकांना धान्य घेतल्याची पावती दिली जात नाही़ त्यामुळे अद्यापही खºया अर्थाने धान्य वितरण प्रणाली व्यवस्थेत पारदर्शकता आली नसल्याचे दिसून येत आहे़
जिल्ह्यातील रेशन दुकानामध्ये सूचना फलक लावण्याकडे कानाडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 10:27 PM