चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी कोर्टातून फरार
By admin | Published: July 12, 2017 12:53 PM
त्या वेळी दोन आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन न्यायालय परिसरातून धूम ठोकल्याची घटना घडली.
आॅनलाईन लोकमतशिरपूर, धुळे, दि. १२ - शहरातील शहादा रोडवरील किराणा दुकान व दुचाकी गाडी चोरी प्रकरणात एकासह दोन अल्पवयीन मुलांना जेरबंद करण्यात आले होते़ त्यांना मंगळवारी दुपारी न्यायालयात नेण्यात आले होते. त्या वेळी दोन आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन न्यायालय परिसरातून धूम ठोकल्याची घटना घडली. शहरातील शहादा मार्गावरील मर्चंट बँकेसमोरील बाबूजी सुपर शॉपी दुकानात चोरी केली होती. ही चोरी करताना ते त्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले होते. याचवेळी शहरातील स्वामी विवेकानंदनगरातील प्लॉट नंबर ६ मध्ये राहणारे किशोर भिकन भोई यांची दुचाकी क्रमांक एमएच १८-एक्यू-२४९५ व बालाजीनगरात राहणारे बादल उदेसिंग पावरा यांची दुचाकी क्रमांक एमएच १८-एएम ६४७२ चोरीच्या घटना घडल्या होत्या. काही तासातच केली अटक दुकानात चोरी करणे व दुचाकी लांबविणाºया तीन आरोपींना पोलिसांनी काही तासातच अटक केली होती. त्यात अनिल रुमल्या पावरा (२८) रा़वाघाडी याच्यासह दोन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. दोघेही अल्पवयीन मुले (धवळी, ता. मध्य प्रदेश) राज्यातील होते.