चिनोदा /धांदरणे : कजर्बाजारीपणामुळे दोन शेतक:यांनी रविवारी रात्री आत्महत्या केल्याची घटना घडली. अंबालाल गिरधर पाटील (40, रा. चिनोदा, ता. तळोदा) आणि नितीन शांतीलाल सोनवणे (36, डाबली ता. शिंदखेडा) असे या शेतक:यांचे नाव आहे.अंबालाल पाटील यांना गेल्या काही वर्षात शेतात आर्थिक नुकसान सहन करावे लागले होत़े यातच त्यांनी दोन वर्षापूर्वी कर्ज काढून खरेदी केलेल्या ट्रॅक्टरच्या व्यवसायातही नुकसान झाले होत़े या ट्रॅक्टरचे हफ्ते थकल्यामुळे फायन्सास कंपनीने ट्रॅक्टर जमा करून घेतल्याची माहिती आह़े यातूनच गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली़ दुस:या दिवशी त्यांचे भाऊ सावकार पाटील यांना मृतदेह दिसला.नितीन सोनवणे यांच्यावर बॅँक, तसेच सावकारी कर्ज असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते चिंतेत होते. त्यात यंदा शेतातून अपेक्षित उत्पादन मिळू शकले नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून शेतातील निंबाच्या झाडाला गळफास लावून घेत त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात प}ी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
दोन शेतक:यांची आत्महत्या
By admin | Published: January 17, 2017 12:07 AM