शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

काँंग्रेसतर्फे दोन तास धरणे आंदोलन

By admin | Published: January 07, 2017 12:18 AM

नोटाबंदीचा निषेध : भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी

नंदुरबार : नोटबंदीच्या घोटाळ्याची चौकशी करावी, बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा उठवावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलकांतर्फे जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले.नोटाबंदी आणि त्या अनुषंगाने जनतेचे झालेले हाल याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि नोटाबंदीतून झालेल्या महाघोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस  कमिटीतर्फे दोन टप्प्यात आंदोलन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत शुक्रवार, 6 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी 11 वाजता नवापूर चौफलीवरून हजारो काँग्रेस कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही गेटवर पक्ष कार्यकर्ते धरणे आंदोलनाला बसले होते. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनकत्र्याच्या मागण्याबँकेतून पैसे काढण्याची बंदी ताबडतोब मागे घ्यावी. 8 नोव्हेंबरपासून पैसे काढण्याच्या तारखेर्पयत सर्व बँक खातेदारांना 18 टक्के व्याजदर देण्यात यावे. कॅशलेश कमिशन रद्द करण्यात यावे.जेवणाच्या अधिकारानुसार देण्यात येत असलेल्या अन्नधान्याच्या किंमती एक वर्षासाठी निम्मे    करण्यात याव्या. शेतक:याला   रब्बीच्या पिकांसाठी एमएसपीवर 20 टक्के बोनस देण्यात यावा.नोटबंदीमुळे महिलांना सर्वात जास्त त्रास झाला आहे. त्यामुळे कमीतकमी बीपीएल परिवाराच्या एका महिलेच्या खात्यामध्ये किमान 25 हजार रुपये जमा करावे.एका वर्षासाठी मनरेगा मजुरांचे कामाचे दिवस व त्यांची मजुरी दुप्पट केली जावी. याचसोबत विशेष अभियानाअंतर्गत नोटाबंदीमुळे बेरोजगार झालेल्या मजुरांना 8 नोव्हेंबरपासून 31 मार्चर्पयत कमीतकमी दरानुसार बेरोजगारी भत्ता देण्यात यावा.यावेळी काँग्रेसचे केंद्रीय निरिक्षक संदीप मंगरोला, जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत, माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत, विद्यमान उपाध्यक्ष सरवरसिंग नाईक, तळोदा तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष रवींद्र पाडवी, शहादा तालुकाध्यक्ष दिलीप गांगुर्डे, नंदुरबार तालुकाध्यक्ष सुभाष राजपूत, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल वसावे, माजी जि.प.अध्यक्ष रमेश गावीत, सभापती दत्तू चौरे, विक्रमसिंग वळवी, बी.के.पाटील, बाजार समितीचे सभापती डॉ.सयाजी मोरे, सुरेश शिंत्रे, नवापूरचे चंद्रकांत नगराळे, नंदु गावीत, रमलाबाई राणा, राहुल शिरसाठ, भटू नगराळे, सैयद मन्सुरी, सुभाष राजपुत, तळोदय़ाचे गौतम जैन, सुरेश इंद्रजीत, नगरसेवक रसिकलाल पेंढारकर आणि स्वरूप बोरस आदी उपस्थित होते. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.