लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्य शासनातर्फे येत्या तीन वर्षात दोन लाख कोटींच्या रस्त्याची कामे करायची आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत अभियंत्यांनी सकारात्मक विचार ठेऊन काम केले पाहिजे, असा सल्ला महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर मंत्री राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार अनिल गोटे, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे आदी उपस्थित होते. राज्यात गुणवत्तापूर्ण रस्ते तयार व्हावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने येत्या तीन वर्षात राज्यातील रस्त्यांची १ लाख ६ हजार कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागाची ३० हजार कोटी व सहा पदरी रस्त्यांची ५० हजार कोटी व अन्य कामांचा समावेश आहे. शासनातर्फे उत्कृष्ट रस्ते तयार केले जाणार आहेत. कुणीही नावे ठेवणार नाहीत? याची काळजी अभियंत्यांनी घ्यावी, असा सल्ला मंत्री पाटील यांनी दिला.
तीन वर्षात राज्यात दोन लाख कोटींची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 5:22 PM
मंत्री चंद्रकांत पाटील : धुळे व नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक
ठळक मुद्देधुळे व नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक.सव्वा तासाच्या बैठकीत सकारात्मक व चांगले काम करण्याचा मंत्री पाटील यांनी दिला सल्ला. चांगले काम करण्याचे अभियंत्यांना दिले आदेश