लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साक्री रोडवरील राजीव गांधी नगरातून एकाला पिस्तुलसह शहर पोलिसांच्या शोध पथकातील कर्मचाºयांनी ताब्यात घेतले़ याशिवाय पिस्तुल प्रकरणी मध्यस्थी करणारा आणि विकत देणारा या दोघांनाही ताब्यात घेतले़ या तिघांना न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ साक्री रोडवरील राजीव गांधी नगरात राहणारा किशोर शांताराम मोरे (२२) या तरुणाकडे पिस्तुल आणि दोन जीवंत काडतूस हस्तगत करण्यात आले़ कोणाकडून आणि कोणाच्या मध्यस्थीने पिस्तुल घेतले याची चौकशी केली असता मोसीन खान असलम खान (२२, रा़ मिल्लत नगर, धुळे) याच्या मध्यस्थीने मयूर उर्फ बबुवा सुरेश कंडारे (२५, रा़अहिल्यादेवी नगर, धुळे) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगण्यात आले़ या दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली असल्याचे पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी सांगितले़ या तिघांना अटक करण्यात आली़ न्यायालयात हजर केले असता २४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शोध पथकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, पोलीस कर्मचारी योगेश चव्हाण, सतिष कोठावदे, कबीर शेख, मुक्तार मन्सुरी, प्रल्हाद वाघ, पंकज खैरमोडे, राहुल पाटील, कमलेश सूर्यवंशी, तुषार मोरे, अविनाश कराड या पथकाने कामगिरी केली़
धुळ्यात पिस्तुलसह एकाकडून दोन जीवंत काडतूस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 1:03 PM