लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मनपा स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत स्थायी समिती सभापती पदासाठी दोन तर महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला़स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी शुक्रवारी विशेष महासभेत निवड प्रक्रिया होणार आहे़ त्यानुसार १६ जानेवारीपासून नामनिर्देशन पत्र उपलब्ध करून देण्यात आले होते तर दाखल करण्यासाठी गुरूवारी दुपारी २ वाजेपर्यंत अंतिम मुदत होती़ स्थायी समितीत १६ सदस्य असून सभापती पदासाठी ९ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे़भाजपला काँग्रेस, शिवसेनेचा पाठिंबामनपा स्थायी समिती सभापती विहीत मुदतीत दोन अर्ज दाखल झाले़ त्यात राष्ट्रवादीचे कमलेश नारायण देवरे व भाजपच्या बिरबालादेवी (वालीबेन) प्रकाशचंद्र मंडोरे यांनी अर्ज दाखल केले़ विशेष म्हणजे मंडोरे यांच्या अर्जासाठी काँग्रेसच्या लिना करनकाळ या सूचक तर शिवसेनेचे विश्वनाथ खरात यांनी अनुमोदन दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत़ सभापती पदासाठी भाजपकडून काँग्रेस व शिवसेनेच्या पाठिंब्याने जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे़ कमलेश देवरे यांच्या अर्जासाठी नलिनी वाडिले सूचक तर जुलाहा नुरून्नीसा मकबुल अली यांनी अनुमोदन दिले़ शुक्रवारी होणाºया महासभेत माघारीसाठी असलेल्या मुदतीत मंडोरे यांनी माघार न घेतल्यास मतदान प्रक्रिया पार पडणार असून ती अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे़महिला बालकल्याण सभापती बिनविरोधमहिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी माधुरी अजळकर यांनी तर उपसभापती पदासाठी पठाण जैबुन्नीसा अशरफखा यांनी अर्ज दाखल केला़ केवळ प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्यामुळे महिला बालकल्याण समिती सभापती, उपसभापतींची निवड बिनविरोध झाली आहे़ अजळकर यांच्या अर्जासाठी चित्रा दुसाणे सूचक तर ललिता आघाव यांनी अनुमोदन दिले़ तर पठाण जैबुन्नीसा यांच्या अर्जाला यमुनाबाई जाधव या सूचक तर नलिनी वाडीले यांनी अनुमोदन दिले आहे़
धुळे मनपात स्थायी समिती सभापती पदासाठी दोन अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 2:41 PM
स्थायीसाठी भाजपच्या उमेदवारास काँग्रेस, शिवसेनेचा पाठिंबा, महिला बालकल्याण सभापती, उपसभापतींची निवड बिनविरोध़
ठळक मुद्देस्थायी समिती सभापती पदासाठी दोन अर्जमहिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक अर्ज स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी शुक्रवारी विशेष महासभेत निवड प्रक्रिया होणार