लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अॅट्रासिटी कायद्यात दुरुस्तीच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान, सोमवारी दिवसभर शहरात शांतता असतांना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास, पारोळा रोडवर दुचाकीवर आलेल्या तरुणांनी दगडफेक करुन दोन बसच्या काचा फोडल्या. दगडफेकीच्या घटनेनंतर ते तेथून पसार झाले. हा सर्वप्रकार अवघ्या काही मिनिटातच घडला. घटनेचे वृत्त कळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. दगडफेकीत सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.सोमवारी सकाळी शहरातील साक्रीरोडवर दलित संघटनेच्या पदाधिकाºयांनी रास्तारोको केला. तर काही संघटनांनी जिल्हाधिकारींना निवेदन देऊन निदर्शने केली. दिवसभर शहरात शांतता होती. परंतु सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एमएच ४० एक्यू ६४२४ क्रमांकाची रावेर - धुळे बस आणि एमएच ४० वाय ९१९२ क्रमांकाची बºहाणपूर - नाशिक या दोन बसवर पारोळारोडवर अहिंसा चौकात दुचाकीवरुन आलेल्या काही तरुणांनी दगडफेक केली. दगडफेकीत दोनही बसच्या काचा फुटल्या आहेत़ अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली होते़ पोलिसांना माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी़ ए़ पाटील यांच्यासह पोलीस दाखल झाले होते़
धुळ्यात दगडफेक करुन दोन बसच्या काचा फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 7:18 PM
पारोळा रोडवरील घटना : प्रवासी सुखरुप
ठळक मुद्देपारोळा रोडवरील अहिंसा चौकातील घटनादगडफेकीत दोन बसचा झाले नुकसानआझादनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल