शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
3
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
5
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
6
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
7
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
8
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
9
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
10
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
11
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
12
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
13
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
14
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
15
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
16
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
18
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
19
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
20
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!

धुळ्यामध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

By देवेंद्र पाठक | Published: November 16, 2023 4:30 PM

पिंपळनेर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

धुळे : साक्री तालुक्यातील सामोडे शिवारासह इदगावपाडा भागात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

सामोडे शिवारातील घटना

एमएच १५ एएक्स ७३१८ आणि एमएच १८ सीए ९५१४ या दोन दुचाकी साक्री पिंपळनेर रोडवरील सामोडे शिवारात एमएसईबी ऑफिससमोर एकमेकांना धडकल्या. अपघाताची ही घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात राम जगन चौरे याला हाताला, डोक्यासह तोंडाला गंभीर दुखापत झाली तर चुनिलाल वाज्या चौरे यांना डोक्याला मार लागला. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना चुनिलाल चौरे यांचा मृत्यू झाला. तर राम चौरे यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी राम चौरे यांच्या फिर्यादीवरून एमएच १८ सीए ९४१४ क्रमांकाच्या फरार दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

दुचाकी- कार अपघातात एकजण ठार

सटाणा पिंपळनेर रोडवर साक्री तालुक्यातील इदगावपाडाजवळील आनंद पेट्राेलपंपासमोर एमएच १५ एचवाय ६५३३ क्रमांकाची कार आणि एमएच १८ टीए ३९३४ क्रमांकाची दुचाकी यांच्यात अपघात झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. यात शिवा सना खराटे (वय २४, रा. वणी ता. दिंडोरी जि. नाशिक. हल्ली मुक्काम मालाचापाडा पो. पानखेडा ता. साक्री) या तरुणाला गंभीर दुखापत झाली. हाता पायासह डोक्याला मार लागला. दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शिवा खराटे या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी उत्तम दयाराम पिठे (महादेव कोळी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात