लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मंडप धुण्यासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना धुळे तालुक्यातील नवलाणे शिवारात शुक्रवारी दुपारी घडली़ही घटना सायंकाळी उजेडात आली़ तालुक्यातील मेहेरगाव गावात राहणारे अनिल शिवाजी भामरे (१८) आणि खुशाल शिवाजी भामरे (४१) हे दोघे मित्र आहेत़ मंडप पाण्यात धूत असताना दोघांचा तोल गेल्याने ही दुर्घटना घडली़ या घटनेमुळे ते राहत असलेल्या मेहेरगावावर शोककळा पसरली आहे.
मंडप धुणाऱ्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:30 AM