धुळे : शिंदखेडा तालुक्यातील पडावद येथे रात्रीतून दोन दुकाने फोडून चोरटय़ांनी 7 हजार रुपये रोख व दोन मोबाइल लंपास केल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली़ याप्रकरणी नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े पडावद येथे राहणारे हंसराज नामदेव ठाकरे (वय 29) यांचे गावात वैष्णवी ङोरॉक्स नावाचे दुकान आह़े 14 रोजी रात्री 9़30 ते 15 जानेवारी रोजी पहाटे 5़30 वाजेदरम्यान अज्ञात चोरटय़ांनी दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील 1 हजार 200 रुपये रोख व 2 हजार 150 रुपये किमतीचे मोबाइल चोरून नेल़े तसेच त्यांच्या दुकानासमोरील छगन भिला परदेशी यांचे किराणा दुकान फोडून चोरटय़ांनी रोख 4 हजार रुपये व मोबाइल चोरून नेला़ रविवारी पहाटे चोरी झाल्याचे लक्षात आल़े याप्रकरणी हंसराज ठाकरे यांनी नरडाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरुद्ध भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक आहेर करीत आहेत़ दोघांचे डोके फोडले, चौघांविरुद्ध गुन्हाटायर व भाडय़ापोटी दिलेले पैसे परत न केल्याच्या कारणावरून आरिफ शेख नुरमहंमद शेख (वय 32, रा़ मौलवीगंज, धुळे) व त्याचा भाऊ सादिक शेख या दोघांना शफीक शाह सत्तार शाह याच्यासह चार जणांनी लोखंडी पाईपने डोक्यावर मारून त्यांचे डोके फोडून जखमी केल़े तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली़ ही घटना 13 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील चाळीसगाव क्रॉसिंगजवळील पल्लवी हॉटेलच्या बाजूला असलेल्या दुकानासमोर घडली़ याप्रकरणी आरिफ शेख नुरमहंमद शेख यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शफीक शाह सत्तार शाह, राजू हंडय़ा, राजू म्याव, जिभाऊ (तिघांचे पूर्ण नाव- गाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक एफ़एस़ पठाण करीत आहेत़ झोपडीला आग लागून नुकसानशिरपूर तालुक्यातील बोराडी शिवारातील टेंभे गावी शिवराम गंगाराम पावरा यांच्या अतिक्रमित शेतातील लाकडी झोपडीला अचानक आग लागून झोपडी जळून खाक झाली़ त्यात गोधडय़ा, खाट, कपडे तसेच कपाशी व धान्य जळून नुकसान झाल़े ही घटना 7 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी बारा वाजेदरम्यान घडली़ याबाबत चुलत भाऊ भरत गाठय़ा पावरा (रा़ बोराडी) याने दिलेल्या माहितीवरून शिरपूर पोलिसात अगAी उपद्रव दाखल करण्यात आला आह़े तपास पो़ह़ेकॉ. अहिरे करीत आहेत़गळफास घेऊन विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील दहीवद येथे घडली़ बाबलीबाई मनोज भिल (वय 27, रा़ दहीवद) असे महिलेचे नाव आह़े तिने 15 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेपूर्वी आसिफ शफीयोद्दीन खाटीक यांच्या मालकीच्या घराच्या मागे भाडय़ाच्या खोलीत नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला़ त्यात विवाहितेचा मृत्यू झाला़ याबाबत आसिफ खाटीक यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत़
पडावद येथे दोन दुकाने फोडली
By admin | Published: January 17, 2017 12:03 AM