साक्री : सुरत-नागपूर महामार्गावर कावठे गावाजवळ रविवारी रात्री आठ वाजता दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोन तरुण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ धुळे येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताच्या ठिकाणापासून थोड्याच अंतरावर झालेल्या दुसºया अपघातात भारत संचार निगमचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना त्याचवेळी घडली आहे. साक्री शहरातील सुवर्ण कला ज्वेलर्सचे मालक युवराज यशवंत विसपुते (३४) हे दुचाकीवरून त्यांच्या शेतातून येत असताना कावठे येथील योगेश दौलत भामरे (३३) हेही गावाकडून दुचाकीने शेतातून महामार्गावर येत असताना दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात योगेश भामरे याच्या पाठीमागे बसलेले दिनेश भास्कर बागुल (३५, रा. कावठे) हे गंभीर जखमी झाले आहे. या अपघातात युवराज विसपुते व योगेश भामरे हे मरण पावले तर दिनेश बागुल यांना उपचारार्थ धुळ्याला हलविण्यात आले आहे. साक्री व कावठे येथील दोन तरुण अपघातात मरण पावल्याने शहरात व कावठे गावात शोककळा पसरली आहे. मृतांच्या नातेवाइकांनी रात्री ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अतुल तांबे व त्यांच्या सहकाºयांनी येथे बंदोबस्त ठेवला़ दरम्यान, महामार्गावर साईडपट्ट्या व फलकांच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते़या अपघातापासून जवळच भारत संचार निगमचे कर्मचारी राजधर शंकर भदाणे (५७, रा. आष्टाणे) हे दुचाकीवर जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहे.
दुचाकींची धडक; दोघांचा मृत्यू
By admin | Published: March 20, 2017 12:38 AM