शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

बियर दिली नाही म्हणून चाकू हल्ला करणाऱ्यास दोन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा

By अतुल जोशी | Published: April 12, 2023 5:55 PM

न्यायालयाने दोन वर्षांची सक्त मजुरी व १५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल सत्र न्यायाधीश एस.सी.पठारे यांनी दिला.

धुळे- बियरची मागणी करून ती दिली नाही म्हणून एकावर पाठीमागून येत चाकू हल्ला केल्याप्रकरणी आरोपी दीपक अनिल कुंभारे (वय २७,रा.धुळे) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षांची सक्त मजुरी व १५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल सत्र न्यायाधीश एस.सी.पठारे यांनी दिला.

जयेश विजय भोपे  हे २३ मार्च १६ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास बिअरबार बंद करून मित्रासमवेत गप्पा करीत होते. त्यावेळी दीपक अनिल कुंभारे हा त्याठिकाणी आला. त्याने बियरची मागणी केली असता, भोपे यांनी दुकान बंद झाल्याचे सांगितले. त्यानंतर भोपे हे जात असताना आरोपीने पाठीमागून येत त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. यात ते जखमी झाले होते. याप्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

सुरवातीला हा खटला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चालला. यात ९ जणांची साक्ष नोंदविण्यात आली. मात्र गुन्हा सिद्ध न झाल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. यानिर्णयाविरूद्ध भोपे  यांनी ॲड. नीलेश  मेहता यांच्या मार्फत सत्र न्यायालयात अपील दाखल केले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भारत भोईटे यांनी युक्तीवाद केला. त्यामुळे सत्र न्यायाधीश एस.सी. पठारे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचा निकाल रद्द करून आरोपी दीपक अनिल कुंभारे यास  दोन वर्षांची सक्त मजुरी व १५ हजार रूपये दंडाची शिक्षा १० एप्रिल २३ रोजी सुनावली. अतिरक्त सरकारी अभियोक्ता भोईटे यांना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एस.जे.मुरक्या, जगदीश सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय