लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यातील तºहाडकसबे येथील यात्रौत्सवात ५०० रूपयांच्या बनावट नोटा चलनात वापरणाºया दोन तरुणांना शिरपूर पोलिसांनी अटक केल्याची घटना सोमवारी रात्री घडली़ अटक केलेल्या दोन तरुणांमध्ये एक दहिवद ता. अमळनेर येथील राहणार आहे. पोलिसांनी ५०० रुपयांच्या १९ बनावट नोटा जप्त केल्या आहेत.तºहाडकसबे येथे सोमवारी महाजन बाबा यात्रेस प्रारंभ झाला. यात्रा दोन दिवस चालते. सोमवारी पहिल्या दिवशी यात्रेत गर्दी होती. ही संधी साधून सोमवारी रात्री बनावट ५०० रूपयांच्या नोटा चलनात आल्याचे व्यापाऱ्यांचे लक्षात आले़ ही माहिती गावातील लोकांना समजल्यावर ते यात्रेत बनावट नोटा वापरणाºया लोकांचा शोध घेत असतांना गर्दीत संशय आल्याने निलेश यादव बेलदार (२७) रा़अर्थे ता़शिरपूर हा तरुणाला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता खिशातून साडे नऊ हजाराच्या ५०० रूपयांच्या १९ बनावट नोटा मिळून आल्यात़ त्याला लगेच यात्रेत बंदोबस्तकरीता असलेले पोलीस कर्मचाºयांच्या स्वाधीन करण्यात आले़ मात्र त्याचा दुसरा साथीदार पसार होण्यात यशस्वी झाला होता़बेलदार यास पोलिस ठाण्यात आणल्यानंतर पोलिस खाक्या दाखविताच त्याने दुसरा साथीदाराचे नाव व पत्ता सांगितला़ त्यामुळे पोलिस पथकाने लागलीच दहिवद ता़अमळनेर येथे जावून १० रोजी पहाटेच्या सुमारास भिका खाटीक रा़दहिवद यास अटक केली.बेलदार हा मूळचा अर्थे ता़शिरपूर येथील असून त्याचे सासर दहिवद पातोंडा ता़ अमळनेर येथील आहे़ सद्या तो अमळनेर येथील बसस्थानकासमोरील संजय बिअरबार येथे वेटर म्हणून कामाला आहे़याबाबत शिरपूर पोलिस ठाण्यात विठ्ठल अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
यात्रेत ५०० च्या बनावट नोटा वापरणाऱ्या दोन तरुणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 5:56 PM