लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सण-उत्सव, जयंतीच्या नावाखाली वर्गणी गोळा करत व्यापाºयांना दमदाटी केली जाते़ गुंडाकडून धमकीही दिली जात असल्याने अशा गुंडाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी मुलायमसिंग युथ ब्रिगेडचे प्रदेश महासचिव गोरख शर्मा आणि पदाधिकाºयांनी केली़ पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांना निवेदन सादर केले़ सण, उत्सवसह जयंती साजरी केली जाते़ आनंदाने साजरे होत असताना गुंडांना लावून व्यापाºयांकडून पैसा वसूल केला जातो़ महानगरातील व्यापाºयांना या गोष्टींचा त्रास होत आहे़ गल्ली नंबर ४, ५, ६, आग्रा रोड, झाशी राणी चौक, दत्त मंदिर परिसरात व्यापाºयांना निवेदन दमदाटी केली जाते़ ५ हजार, ११ हजार, २१ हजार याप्रमाणे पैशांची मागणी केली जाते़ सण, उत्सव आणि जयंतीच्या नावाखाली शहरातील गुंडाकडून राजरोसपणे हे धंदे सुरु आहेत़ जीएसटी कर प्रणाली, मंदि यामुळे व्यापारी बेजार झाला आहे़ त्रस्त असल्यामुळे व्यापार ठप्प झाला आहे़ अशा अपप्रवृत्तींचा नायनाट करत गुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा, याकडे पोलीस अधीक्षक यांनी स्वत: लक्ष द्यावे अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली़ पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांना निवेदन सादर करताना गोरख शर्मा यांच्यासह अश्पाक मिर्झा, रफिक शाह, इनाम सिद्दीकी, गुलाम कुरेशी, नवाब खान, जाकीर खान, राजकुमार व्यास, प्रशांत शर्मा, महेश शर्मा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते़
धुळ्यात वर्गणीच्या नावाखाली व्यापाºयांना दमदाटीचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 6:42 PM
बंदोबस्त करा : मुलायमसिंग युथ बिग्रेडची मागणी
ठळक मुद्देदमदाटीमुळे व्यापारी चिंताग्रस्तबंदोबस्त करण्याची होतेय मागणीपोलीस अधीक्षक यांना निवेन