धुळे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांनी ५ आॅगस्टपर्यंत तांत्रिक त्रुटी दूर करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थी शेतकºयांसाठी आधार अपडेशन व बँक खाते लिंकिंगची कार्यवाही करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.या मोहिमेंतर्गत शेतकºयांनी कृषी सहाय्यक, तलाठी, कृषी मित्रांच्या सहकायार्ने किंवा स्वत: आपले सरकार केंद्रावर जावून आपले आधार कार्ड, बँक खाते क्रमांक आदी तांत्रिक बाबींमध्ये असलेली त्रुटी तत्काळ दुरुस्त करून घ्यावी.जेणेकरून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची रक्कम आपल्या खात्यावर जमा करणे शासनास सुलभ होईल. धुळे जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकºयांनी ही कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी पत्रकाद्वारे केली आहे़
लाभासाठी आधारकार्ड अपडेट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 10:02 PM