शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 11:42 AM

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. शरद गडाख यांचे प्रतिपादन

आॅनलाइन लोकमतधुळे : आजचे बदलते हवामान पाहता अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी सुधारित व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यामुळे अधिकाधिक उत्पन्न व उत्पादन घेणे शक्य होऊ शकेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ.शरद गडाख यांनी आज येथे केले.कृषी महाविद्यालय धुळे, कृषी विज्ञान केंद्र आणि विभागीय विस्तार केंद्र धुळे, कृषी विभाग,आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्टÑीय कृषी विकास योजना (शेतकरी प्रथम) व धुळे-नंदुरबार अंतर्गत आयोजित कृषी तंत्रज्ञान दिन, शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षपदावरून डॉ. गडाख बोलत होते.व्यासपीठावर कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. पंकज कुमार महाले, शिक्षण संचालक डॉ. अशोक फरांदे, कृषी महाविद्यालय धुळेचे सहयोगी अधिष्ठता डॉ. अशोक मुसमाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे, डॉ. मुरलीधर महाजन, डॉ. चिंतामणी देवकर उपस्थित होते.या कार्यक्रमाच्यावेळी प्रगतीशील शेतकरी श्रीराम पाटील, प्रकाश पाटील, हिंमतराव माळी, वसंतराव पाटील या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.डॉ. गडाख पुढे म्हणाले की, बदलत्या हवामानात जास्त उत्पादन येण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे विकसीत सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठाने १२० पिकांवर संशोधन करून २६३ वाण, ३६ यंत्र व अवजारे विकसीत केल्याचे त्यांनी सांगितले.धुळे जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. अतिवृष्टी व नुकसानीबाबत माहिती देवून माती व पाणी यांचे होणारे प्रदूषण आणि मातीची होणारी झीज टाळण्यासाठी शेतकºयांनी उपाययोजना कराव्यात असे डॉ. अशोक फरांदे यांनी सांगितले. तर कृषी विद्यापीठाद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून विविध मोबाईल अ‍ॅप तयार केल्याची माहितीही शेतकºयांना दिली.कृषी विद्यापीठाने विकसीत केलेले तंत्रज्ञान शेतकºयांपर्यंत पोहचविणे हाच या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे डॉ. अशोक मुसमाडे यांनी यावेळी सांगितले.यावेळी तांत्रिक चर्चासत्र झाले. गहू उत्पादन तंत्रज्ञानाबाबत डॉ. सुरेश दोडके, रब्बी कांदा उत्पादन तंत्रज्ञानाबाबत डॉ. श्रीधर देसले, मका पिकातील अमेरिकन लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉ. पंकज पाटील, कापूस पीक व्यवस्थापन यावर डॉ. मुरलीधर महाजन तर डाळींब पीक व्यवस्थापनावर डॉ. दिनेश नांद्रे यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :Dhuleधुळे