ऑनलाईन लोकमत जैताणे,जि.धुळे, दि.29 - साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील आमखेल, छडवेल, चिपलीपाडा, वरसुस येथील विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत मिळणा:या पास यावर्षी मिळत नाहीत. त्यासंदर्भात शिवसेना, शैक्षणिक संस्था व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे आगार व्यवस्थापकांकडे निवेदन देण्यात आले. शिवसेना जिल्हा उपप्रमुख भुपेश शाह, जैताणे सरपंच संजय खैरनार, जिल्हा परिषद सदस्या इंदूताई खैरनार, आमखेल उपसरपंच ज्ञानेश्वर पवार, निजामपूर जैताणे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नितीन भाई शाह, साक्री पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन बेडसे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष जयेश साळुंखे यांनी साक्री आगार व्यवस्थापक उमेश बिरारी यांना निवेदन देवून समस्या मांडल्या व चर्चा केली. विद्यार्थीनींची आठ किलोमिटर पायपीट आखाडे, फोफादे, होडदाणे, म्हसाळे आदी ठिकाणाहून 200 विद्यार्थी व विद्यार्थिनी निजामपूर जैताणे येथे शिक्षणासाठी येत असतात. मागच्या वर्षापयर्ंत मालेगाव आखाडे ही आखाडे मुक्कामी बस येत होती. परंतु काही कारणास्तव ही बस देवजीपाड पयर्र्तच करण्यात आली आहे. त्यामुळे आखडेहून येणा:या 54 मुलींना आठ किलोमीटर दररोज सकाळी पायपीट करून यावे लागते.
विद्यार्थीनींच्या पाससाठी आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 6:24 PM