धुळे : मद्यसम्राट दादा वाणी याच्यावर एमपीडीअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडून जिल्हाधिका:यांकडे पाठविण्यात आला होता़ अखेर चार महिन्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी प्रस्ताव मंजूर करून दादा वाणीला स्थानबद्ध केले आह़े दरम्यान, या निर्णयामुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आह़े वाणी आता नाशिक मध्यवर्ती कारागृहात एक वर्ष स्थानबद्ध राहणार आहे. प्रवीण भालचंद्र उर्फ दादा वाणी (वय 40, रा़ पळासनेर, ता़शिरपूर व ह़मु. गोविंदनगर, हॉटेल सायबासमोर, शिरपूर) याचा गेल्या अनेक वर्र्षापासून धुळ जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात व गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक राज्यांत अवैध मद्यनिर्मिती व तस्करी करण्याचा व्यवसाय सुरू होता़ त्याच्याविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात एकूण 10 व मोहाडी उपनगर पोलिसात एक असे 11 गुन्हे दाखल होत़े तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शिरपूर पोलिसात 2 व सांगवी पोलिसात 3 असे एकूण 5 गुन्हे दाखल होत़े दाखल गुन्ह्यात तो फरार होता़ पोलिसांच्या नजरेआड राहून त्याच्या हस्तकामार्फत गुन्हे करत होता़ त्याच्यावर दाखल गुन्ह्यांची दखल घेऊन पोलीस अधीक्षक चैतन्या एस., अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनावरून दादा वाणी याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्येविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणा:या व्यक्ती (व्हिडिओ पाररेट) वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणा:या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम सन 1981 (महाराष्ट्र कायदा क्रमांक 55 सन 1981) प्रमाणेचा प्रस्ताव तयार करून तो 22 ऑगस्ट 2016 रोजी मंजुरीसाठी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे पाठविला होता़ जिल्हाधिका:यांनी दखल घेऊन प्रस्तावाचे कामकाज सुरू करून कामकाजाअंती 1 फेब्रुवारी रोजी दादा वाणी यास स्थानबद्ध केल्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रशासनास दिले.अवैध धंदे करणा:यांचीही यादी तयारपोलीस प्रशासनाने जिल्ह्यात अवैध धंदे करणा:यांचीही यादी तयार केली आह़े अवैध धंदे करणा:यांवर कारवाईचा बडगा उगारून त्यांना एम़पी़डी़ए. व संघटित गुन्हेगारीचे प्रस्तावानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक चैतन्या एस. यांनी सांगितल़े पाथर्डीतून नाशिक कारागृहात रवानगी4दादा वाणी याला अटक झाल्याने तो पाथर्डी (जि़ अहमदनगर) कारागृहात होता़ त्याचे स्थानबद्धतेचे आदेश घेऊन धुळे एलसीबीच्या एका स्वतंत्र पथकाने पाथर्डी येथे जाऊन त्याच्याविरुद्ध न्यायालयाकडून स्वतंत्र परवानगी घेऊन त्याला ताब्यात घेतले व स्थानबद्ध केल्याचे आदेश पारित करून दादा वाणीला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आह़े‘लोकमत’ने प्रस्ताव पडून असल्याबाबत दिले होते वृत्त4‘लोकमत’ने 30 जानेवारीच्या अंकात हद्दपारीचे 43 प्रस्ताव प्रलंबित व त्यात दादा वाणीचा एम़ पी़डी़ए.अंतर्गत कारवाई प्रस्ताव जिल्हाधिका:यांकडे चार महिन्यांपासून पडून असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होत़े
मद्यसम्राट दादा वाणी ‘स्थानबद्ध’
By admin | Published: February 07, 2017 12:55 AM