आॅनलाइन लोकमतधुळे : अंगणवाडी कर्मचाºयांच्या भरतीवरील निर्बंध उठवावेत, अल्प उपस्थितीच्या अंगणवाड्याचे एकत्रिकरण करण्यात येवू नये, अंगणवाडी कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणेच वेतन व भत्ते लागू करण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघातर्फे सोमवारी भर पावसात अंगणवाडी सेविकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले.कल्याण भवनापासून दुपारी मोर्चास सुरवात झाली. हा मोर्चा शिवतीर्थ, जुने जिल्हा रूग्णालयामार्गे जिल्हा परिषदेवर धडकला. मोर्चात शासनविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ मोर्चा अडविण्यात आला. प्रवेशद्वाराजवळ सेविकांनी ठिय्या मांडला. या वेळी माया परमेश्वर, अॅड. गजानन तडे, युवराज बैसाणे, कृष्णा पाटील, यांनी मार्गदर्शन केले. अंगणवाडी कर्मचाºयांच्या भरतीवरील निर्बंध उठवावेत, अल्प उपस्थिीच्या अंगणवाड्यांचे एकत्रिकरण करण्यात येवू नये. तसेच अंगणवाडी कर्मचाºयांची कपात करण्यात येवू नये, अंगणवाडी कर्मचाºयांना पूर्णवेळ काम देवून, शासकीय/निमशासकीय कर्मचाºयांचा दर्जा लागू करावा,अंगणवाडी कर्मचाºयांना मिळणाºया सेवासमाप्ती लाभामध्ये सुधारणा करण्यात यावी. अंगणवाडी कर्मचाºयां दिल्या जाणाºया भाऊबीज भेटीच्या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी,अंगणवाडी कर्मचाºयांना दरवर्षी मानधनात २० टक्के मानधन वाढ करण्यात यावी.अंगणवाडीसेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा साडेदहा हजार तसेच मदतनीसांना ८ हजार रूपये मानधन लागू करण्यात यावे. अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांच्या निधनानंतर अनुकंपातत्वावर वारसदारांना समावून घ्यावे.अंगणवाडी केंद्रस्तरावर मिळणारा परिवर्तनीय निधी एक हजार ऐवजी पाच हजार करावा. गणवेशाच्या रकमेत ६०० रूपये ऐवजी १ हजार रूपये करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले.या मोर्चात जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.
विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 4:25 PM
विविध घोषणांनी परिसर दणाणला, जिल्हा परिषद प्रशासनाला दिले निवेदन
ठळक मुद्देभर पावसात निघाला मोर्चामोर्चात शेकडो सेविका सहभागीशासनविरोधी घोषणांनी परिसर दणाणला