शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

जिल्हाभरात विविध कार्यक्रम : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:51 PM

तहाडी येथे डॉ.आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना सरपंच जयश्री पाकळे. उपस्थित उपसरपंच गणेश भामरे, प्रफुल्ल पाटील, उजनबाई ...

ठळक मुद्देdhule

तहाडी येथे डॉ.आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना सरपंच जयश्री पाकळे. उपस्थित उपसरपंच गणेश भामरे, प्रफुल्ल पाटील, उजनबाई अहिरे, सुनील पाकळे, सुदाम भलकार, डी.बी. अहिरे, के.डी. अहिरे आदी.तºहाडी येथे डॉ.आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना सरपंच जयश्री पाकळे. उपस्थित उपसरपंच गणेश भामरे, प्रफुल्ल पाटील, उजनबाई अहिरे, सुनील पाकळे, सुदाम भलकार, डी.बी. अहिरे, के.डी. अहिरे आदी.धुळे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात विविध उपक्रमांचे आयोजन करुन अभिवादन करण्यात आले. संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालयातर्फे प्रतिमापूजन करण्यात आले.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानशिरपूर- शहरातील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानामधील डॉ़आंबेडकर यांच्या पुतळ्यास भाजपातर्फे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष रमेश वसावे, अनु.जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, कुउबा समिती संचालक चंद्रकांत पाटील, आबा धाकड, शहराध्यक्ष हेमंत पाटील, महेंद्र पाटील, मुबीन शेख, राधेश्याम भोई, अविनाश शिंपी, बापु लोहार, रविंद्र भोई, शानाभाऊ राजपुत, रविंद्र सोनार, संभाजी पाटील, नंदु माळी, जयवंत सरदार आदी उपस्थित होते़  कापडणे येथे उपक्रमकापडणे- येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमापूजन करण्यात आले. यावर्षी मिरवणूक न काढता प्रतिमापूजन करून पुलवामा घटनेतील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी सरपंच भटू पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष नवल पाटील, उपसरपंच भैय्या पाटील, माजी उपसरपंच भैया बोरसे, मनोज पाटील, प्रा.डॉ. प्रकाश भामरे, ग्रा.पं. सदस्य महेंद्र भामरे, भटू पाटील, अमोल बोरसे, बालू पाटील, विनोद भामरे, संतोष भामरे, सचिन भामरे, संदीप ब्राह्मणे आदी उपस्थित होते.तºहाडी येथे विविध कार्यक्रमतºहाडी- सरपंच जयश्री पाकळे यांच्याहस्ते डॉ.आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच गणेश भामरे, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, उजनबाई अहिरे, सुनील पाकळे, माजी सरपंच सुदाम भलकार, निवृत्त शिक्षणाधिकारी डी.बी अहिरे, के.डी. अहिरे व ग्रामस्थ उपस्थित होते. तºहाडी विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष सुधीर भामरे, मुख्याध्यापक एन.एच. कश्यप यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक डी.बी. पाटील, सुभाष भामरे, ए.एम. सोनवणे, डी.एस. मोरे, ए.के. पाटील, रावसाहेब चव्हाण आदी उपस्थित होते. निमगुळ येथे अभिवादननिमगुळ येथील राजवाडा चौकात विविध पक्ष, संघटनांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सयाजीराव बागल, सरपंच बापू सोनवणे, तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव बागल, उपसरपंच सुपाबाई साळवे, माजी उपसरपंच दीपक बागल, गटनेते डॉ.वीरेंद्र बागल, हितेंद्र बागल, नंदलाल बागल, ग्रामसेवक बोरसे, हरी कुवर, अ‍ॅड.जगदीश कुवर, संदीप बैसाणे, युवराज बागल आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी हिंमत बैसाणे, संजय साळवे, भगवान साळवे, विजय साळवे, कैलास साळवे, किरण साळवे, मुकेश भामरे, पदमाकर साळवे, विनोद साळवे, मिलिंद साळवे, सुरेश गुलाले, अनिता साळवे, जिजाबाई भामरे, लताबाई साळवे, कमलबाई साळवे, मंगलाबाई साळवे, सखुबाई चित्ते, राधाबाई साळवे, अरुणाबाई साळवे, सुरेखा साळवे, संजय साळवे, सरलाबाई राजेंद्र साळवे, सारिका साळवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटनेते राजेंद्र साळवे यांनी केले.साक्रीरोड परिसरातून रॅलीधुळे- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साक्रीरोड परिसरातून जल्लोषात रॅली काढण्यात आली. सकाळी ८ वाजता कृषीनगर, साक्रीरोड, लुंबीनीविहार परिसर, महिंदळे शिवार, मोगलाई, पद्मनाभ नगर तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक सिंचन भवन येथे जमा झाले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यात आला, अशी माहिती सेवानिवृत्त कृषी अधिकारी बी.यू. वाघ यांनी दिली. 

टॅग्स :Dhuleधुळे