शिंदखेडा : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये मतदानाची जागृती व्हावी व मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा यादृष्टीने शिंदखेडा येथील गांधी चौकात शहरातील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांनी मतदान जागृती फेरी काढून विविध कार्यक्रम सादर केले.यात जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयतील विद्यार्थ्यांनी मतदान गीते व पथनाट्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमाला तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी साहेबराव सोनवणे, नायब तहसीलदार रावसाहेब बोरसे, गटशिक्षणाधिकारी एस.के. गायकवाड, जनता विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मनोहर गोरख पाटील, खजिनदार देवेंद्र पोपटराव बोरसे, संचालक गोरख राघो पाटील, अशोक गैधल पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश नागो देसले, नगरसेवक सुनील चौधरी, किसन सकट, अव्वल कारकून गोटू ठाकूर, प्राचार्या एम.डी. बोरसे, पर्यवेक्षक उमेश देसले, इतर शाळेतील मुख्याध्यापक डी.सी. गिरासे, एम.डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी एस.के. गायकवाड हे उपस्थित होते. कार्यक्रमाला शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात मतदान जनजागृती व्हावी यासाठी प्रफुल पाटील याने मतदार गीत सादर केले. तसेच कृपा पाटील, एकता बोरसे, प्रेरणा बोथरा, प्रसन्ना शिंपी, प्रांजल माळी आदी विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर करून मतदान जागृती केली. यावेळी सर्व नागरिकांना मतदान करण्याबाबत शपथही देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी लोकांना मतदानाबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन एस.ए. पाटील यांनी तर आभार उपशिक्षक ए.टी. पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील शिक्षक शिक्षका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शन उपशिक जे.डी. बोरसे यांनी केले
Vidhan Sabha 2019 :शिंदखेडा येथे मतदानासाठी विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 1:20 PM