लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या मैदानावर काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची सभा असल्याने लहान-मोठ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती़ त्यामुळे सुदैवाने कोणताही गोंधळ उडाला नाही़ काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची धुळ्यात सभा आयोजित केल्यामुळे होणारी गर्दी आणि वाहनांची संख्या लक्षात घेता पार्किंगची व्यवस्था स्वतंत्र्यपणे करण्यात आली होती़ परिणामी गोंधळ उडाला नाही़ साक्री, पिंपळनेर येथून येणाºया नागरीकांनी त्यांची वाहने नदीकिनारी लागून केलेल्या नवीन रस्त्यावरुन हत्तीडोहामार्गे पॉलिटेक्निकच्या मैदानावर वाहने लावली़ चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, जळगावकडून येणाºया नागरीकांनी बायपास रोडने बिलाडी फाटा मार्गे येवून पॉलिटेक्निकच्या मैदानावर वाहने लावली़ शिरपूर, दोंडाईचा, नरडाणा या भागातील नागरीकांनी बायपास उड्डाणपुलावरुन बिलाडी फाटा मार्गे येवून पॉलिटेक्निकच्या मैदानावर वाहने लावली होती़ तसेच मालेगाव, नाशिककडून येणाºया नागरीकांनी इंदूर बायपास रोडने बिलाडी फाटाकडून एसएसव्हीपीएस कॉलेजकडे जाणाºया रोडने पॉलिटेक्निकच्या मैदानावर वाहने लावली़ तसेच शहरातील नागरीकांसाठी देवपुर बसस्थानकाच्या मागील बाजूस पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती़ नागरीकांनी आपली मोठी वाहने त्याचठिकाणी लावली होती़ निमंत्रिणांसाठी सभा ठिकाणच्या उत्तरेकडे नॉर्थ पॉर्इंटच्या शाळेच्या पटांगणावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती़
वाहन चालकांना दिली होती सुचनानागरीकांनी सभेस येताना एकटे, दुकटे न येता समुहाने यावे़ जेणे करुन पार्किंगसाठी जागा उपलब्ध होईल़ तसेच वाहन चालकांनी वाहने सोडून इतरत्र जावू नये अशाही सूचना यापुर्वीच देण्यात आल्याने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली़