शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

पहिल्याच दिवशी 318 उमेदवारांची दांडी

By admin | Published: March 22, 2017 11:57 PM

धुळे : शहरात पोलीस व एसआपीएफसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आह़े

धुळे : शहरात पोलीस व एसआपीएफसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आह़े दररोज 700 उमेदवारांना बोलविण्यात आले आहेत़ त्यात पहिल्याच दिवशी पोलीस भरतीसाठी 179, तर एसआरपीएफला 139 असे एकूण 318 उमेदवार गैरहजर राहिले आहेत़ जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या 46 जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने एकूण 7 हजार 901 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत़ त्यात पुरुष 6 हजार 907 व महिलांचे 994 अर्ज आहेत़ पोलीस कवायत मैदानावर भरती प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली़ त्यात 700 उमेदवारांना शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात आले होत़े त्यापैकी 551 उमेदवार हजर होत़े, तर 179 गैरहजर होत़े  उंचीमध्ये 37, छातीमध्ये 17 उमेदवार अपात्र ठरल़े 467 उमेदवारांना चेस्ट नंबर वाटप करण्यात आल़े भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना मिळालेले गुण त्याच ठिकाणी दाखविण्यात येत आहेत़ भरतीची व्हिडिओ रेकॉडिंग करण्यात येत आह़े मैदानावर एकूण 25 व्हिडिओ कॅमेरे फोटोग्राफरसह कार्यरत आहेत़  तसेच 8 सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले आहेत़ उमेदवारांसाठी वैद्यकीय पथकाची नेमणूक करण्यात आली आह़े दहा-दहा उमेदवारांचे गट तयार करून त्यांना मैदानी चाचणीसाठी पाठविण्यात येत आह़े 100 मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी, पुलप्स  या मैदानी चाचण्या दुपारी एक वाजेच्या आत पूर्ण करण्यात येत आह़े तर उमेदवारांची 1600 मीटर धावण्याची चाचणी उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारी साडेचारनंतर करण्यात येत आह़े त्यासाठी मैदानावर लाईटची व्यवस्था करण्यात आली आह़े भरती प्रक्रियेवर पोलीस अधीक्षक चैतन्या एस., अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व पोलीस उपअधीक्षक देवीदास गवळी हे लक्ष ठेवून आहेत़ एसआरपीएफला मैदानी चाचणीत 443 उमेदवार पात्रराज्य राखीव पोलीस बल गट क्र 6 (एसआरपीएफ)च्या 56 जागांसाठी एकूण 15 हजार 475 अर्ज आले आहेत़ एसआरपीएफसाठीही बुधवारपासून भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला़ त्यात दररोज 700 उमेदवारांना बोलविण्यात आले आह़े बुधवारी 561 उमेदवार हजर होते, तर 139 गैरहजर होत़े हजर उमेदवारांची 100 मीटर धावणे, लांब उडी, 5 कि़मी. धावणे ही मैदानी चाचणी घेण्यात येत आह़े त्यात 5 कि़मी. धावणे ही चाचणी गोंदूर रोडवर घेण्यात आली़ पहिल्या दिवशी मैदानी चाचणीत 443 उमेदवार पात्र ठरले असून 25 दिवस ही भरती प्रक्रिया सुरू राहील, अशी माहिती एसआरपीएफचे समादेशक श्यामराव दिघावकर यांनी दिली़