धुळे : महापालिकेच्या निवडणुकीत लोकसंग्राम पक्षाच्या उमेदवारांसाठी शिट्टी चिन्ह देण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी असमर्थता दाखविली आहे. त्यामुळे आमदार अनिल गोटे मंगळवारी संतापले. त्यांच्या समर्थक कार्यकर्त्याने निवडणूक निर्णय अधिकाºयांशी हुज्जत घातली.
निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या यादीत लोकसंग्राम पक्षातर्फे अधिकृतपणे फक्त तीन उमेदवार दिसत आहेत. यादीत ११५ अपक्ष उमेदवार असून त्यात गोटे समर्थक कोण व अन्य कोण, याबाबत उलगडा होत नाही. कारण त्यांनी अद्याप पक्षाच्या उमेदवारांची यादीही प्रसिद्ध केलेली नाही. आपले उमेदवार आणि समर्थक अपक्ष उमेदवारांना शिट्टी चिन्हे मिळावे, अशी मागणी त्यांनी केली होती. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी आचारसंहितेनुसार चिठ्ठया टाकून निवडणूक चिन्ह दिले.
दरम्यान, डाव्या लोकशाही आघाडीचे नेते पोपट चौधरी, हिरालाल सापे यांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा जाहीर केला. सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप करत असल्याचा आरोप माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी केला.