साक्री : तालुक्यातील घोडदे गावात मोठय़ा प्रमाणात दारूविक्री होत असल्याने कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत़ यावर र्निबध लावण्यात यावे, तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी साक्री पोलीस ठाण्यावर शनिवारी मोर्चा काढण्यात आला़ साक्री तालुक्यातील घोडदे गावात अवैध दारू व्यवसाय सुरू आह़े गावातील तरुण पिढी व्यसनाधीन झाली असून अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे गावात त्वरित दारूबंदी करावी. तसेच अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी घोडदे येथील ग्रामस्थांनी साक्री पोलीस ठाण्यावर शनिवारी मोर्चा निघाला होता़ विशेष म्हणजे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतने दारूबंदीचा केलेला ठराव आणि त्याबाबत निवेदन पोलिसांना सादर केल़े घोडदे गावात अवैध दारू विक्रेत्यांनी ठाण मांडले.घोडदे गावात तातडीने दारूबंदी करावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख विशाल देसले यांनी केली आह़े अन्यथा, रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने दिलेला आह़े
दारूबंदीसाठी घोडदे ग्रामस्थांचा ‘एल्गार’!
By admin | Published: February 05, 2017 12:26 AM