शिरपूर : महाराष्ट्र-मध्यप्रदेश सरहद्दीवरील सेंधवा येथे कोरोना संसर्गाचे १३ रूग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. सरहद्दीवरील गावांना त्यांचा फटका बसू शकतो म्हणून बाहेरून येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना प्रांताधिकारी डॉ़विक्रमसिंग बांदल यांनी रोहिणी येथे घेतलेल्या बैठकीत गावकऱ्यांना दिल्यात़शुक्रवारी प्रांताधिकारी डॉ़विक्रमसिंह बांदल यांनी तालुक्यातील मध्यप्रदेश सरहद्दीवरील गावांना भेटी दिल्या. तसेच बाहेरुन येणाºया लोकांकडे लक्ष देण्याच्या सुचना ग्रामस्थांना केल्या. तसेच काय खबरदारी घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन केले.त्यांनी दुपारी रोहिणी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली़ त्यावेळी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी काय काळजी घेण्यात यावी, याबाबत मार्गदर्शन केले़ आपल्या गावालगत असलेले मध्यप्रदेश राज्यात कोरोना संसर्ग झालेले रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने आपणास अधिक खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.मध्यप्रदेशातील कोणत्याही व्यक्तीला आपल्या गावात किंवा परिसरात येऊ देता कामा नये. तसेच आपल्याकडील कोणताही व्यक्ती बाहेरगावी खास करुन मध्यप्रदेश राज्याच्या सिमेत जाता कामा नये, याची दक्षता घ्यावी, असेही सुचीत केले़यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़प्रसन्न कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य कैलास पावरा, सरपंच डॉ़आनंद पावरा, उपसरपंच बन्सीलाल बंजारा, पुनमचंद पावरा, बासू बंजारा, ग्रामसेवक कुमावत, पोलिस पाटील सुभाष पावरा, रोहिणी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ़अभिजित पाटील, डॉ़अहिरे आदी उपस्थित होते़
मध्यप्रदेश सीमेवर बाहेरील लोकांसाठी ‘गावबंदी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 10:08 PM