लोकमत न्यूज नेटवर्कविंचूर : कर्जाच्या विवंचनेतून गळफास घेऊन शेतकºयाने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना धुळे तालुक्यातील विंचूर गावात घडली़ रविवारी सकाळी ही बाब उजेडात आली़ संदिप भास्कर बोरसे (पाटील) (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव आहे़ संदिप हा शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घरी काहीही न बोलता निघून गेला होता़ ही बाब रविवारी सकाळी लक्षात आल्याने गावात त्याचा शोध घेणे सुरु होते़ त्याचे चुलत काका प्रकाश बाळू बोरसे हे शेतात गेले असता त्यांना विंचूर शिवारातील शेताच्या एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला़ ग्रामस्थांच्या मदतीने त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून संदिपला मृत घोषीत केले़ धुळ्यातील एका राष्ट्रीयकृत बँकेतून गेल्या चार वर्षापुर्वी सुमारे २ लाखांचे ठिबक व पिकांसाठी त्याने कर्ज घेतले होते़ गेल्या तीन वर्षापासून नापिकीमुळे त्याला कर्ज फेडणे अशक्य झाले होते़ त्याने कर्जमाफी योजनेचा अर्जही दाखल केला होता़ सुमारे दीड लाख कर्जमाफी योजनेत नाव आल्याने सदर रक्कम वजा करुन उसनवारीने उर्वरीत पैसे तो भरणार होता़ मात्र, संपुर्ण रक्कम भरल्यानंतर कर्जमाफीचा लाभ मिळेल असे बँकेच्या कर्मचाºयाने सांगितले होते़ मुद्दल व व्याज मिळून जमा होणारी संपुर्ण रक्कम जमवणे शक्य होत नाही व यंदाही दुष्काळी परिस्थिती उदभवल्याने त्याने आत्महत्या केली असावी, अशी चर्चा गावात सुरु होती़ संदिप याचे शवविच्छेदन आणि घटनेचा पंचनामा केल्यानंतर शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्याच्या पश्चात आई लिलाबाई भास्कर बोरसे तसेच पत्नी, तीन मुले असा परिवार आहे़ विंचूर गावात शोककळा पसरली आहे़
विंचूरला तरुण शेतकºयाने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 6:14 PM
बँकेचे होते कर्ज : सततच्या नापिकीला कंटाळला होता
ठळक मुद्देधुळे तालुक्यातील विंचूर गावातील घटनाझाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या