लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोणीही कायदा हातात घेवू नये़ प्रत्येकाने कायद्याचे तंतोतंत पालन करावे़ अन्यथा, शांततेचा भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल़ अशी तंबी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत यांनी शांतता समितीच्या बैठकीतून दिली़ शहरात शांतता अबाधित रहावी यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोर्जे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समितीची बैठक नुकतीच पार पडली़ यावेळी अनेकांची उपस्थिती होती़ त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या़ असे असलेतरी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत यांनी आपल्या पोलीस ठाणे अंतर्गत येणाºया भागातील नागरीकांसाठी शांतता समितीची बैठक सोमवारी सायंकाळी उशिरा घेतली़ शांतता समितीच्या बैठकप्रसंगी पंचवटी नगर, पवन नगर, हिदायत मशीद यासह अन्य भागातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़ संगिता राऊत यांनी आपल्या मनोगतातून शांततेसह कायदा व सुव्यवस्था कशी टिकविता येईल यावर मार्गदर्शन केले़ त्यांनी केलेल्या प्रभावी भाषणामुळे महिलांकडून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला़ पोलीस उपस्थित होते़
शांततेचा भंग केल्यास कठोर कारवाईच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 6:02 PM