धुळे : एैन दिवाळीच्या काळात चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेला पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडतांना विचार करावा लागत आहे़ शनिवारी दिवाळीच्या पूर्वसंध्येला आग्रारोडवर नागरिकांना खरेदीसाठी गर्दी केली होती़ मात्र अचानक जोरदार पावसाने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.दिवाळीनिमित्त आग्रारोडवरील पाचकंदिल ते महात्मा गांधी पुतळा, तसेच नवीन महापालिका ते संतोषी माता मंदिर चौकापर्यंत विविध वस्तू विक्रीचे दुकाने सजली आहेत़ धन त्रयोदशीच्या दिवसापासून बाजारपेठेत खरीददारांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे़ मुख्य रस्त्यावर चालायलाही जागा मिळणे शक्य होत नाही़. पहिल्यांच दिवशी कपडे, सोने-चांदी, वाहन आदींची खरेदी झाल्याने, कोट्यावधींची उलाढाल झाली आहे.खरेदीसाठी धावपडरविवारी लक्ष्मी पुजन असल्याने शनिवारी बाजारा मोठी गर्दी झाली होती़ केरसुणीला फारसे स्थान राहिलेले नसले तरी दिवाळीनिमित्त लक्ष्मींची मूर्तीसोबत केरसुनीची पुजा केली जाते़ लक्ष्मी पुजनाच्या दिवशी लक्ष्मीच्या मूर्तीसोबत केरसुनीची पुजा केली जात असल्याने केरसुनीची विक्री झाली़ व्यापारी वर्ग दिवाळीच्या सणात व्यवहारातील जमा खर्च नोंदणीसाठी खतावण्यांचा वापर करीत असतात; यामुळे दिवाळी पाडव्या निमित्त खतावण्यांची पूजा व्यापारी वगार्तून करण्यात येते. या खतावण्या विकल्या जात आहेत़अचानक उडाली धावपडआठवड्याभरापासून रिमझिम तर कधी जोरदार पाऊस सुरू आहे़ त्यामुळे विक्रेत्यांची धावपळ तर व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे़
दिवाळी सणावर पावसाचे ‘विरजण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 1:27 PM