धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ़ पल्लवी सापळे यांनी धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंडळाला सदिच्छा भेट दिली़ यावेळी मंडळाचे अध्यक्ष मदनलाल मिश्रा यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले़डॉ़ पल्लवी सापळे यांच्यासमवेत हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड विभागाचे अध्यक्ष डॉ़ राजकुमार सूर्यवंशी, डॉ़ दीपक शेजवळ यांनी राजवाडे संशोधन मंडळातील ऐतिहासिक साधनांची पाहणी केली़ संस्थेतील ऐतिहासिक साधनासंदर्भात प्रा़ श्रीपाद नांदेडकर, सहायक अभिरक्षक राजश्री भडागे यांनी माहिती दिली़ मिळालेली माहिती आणि जुने संदर्भ डॉक्टरांनी जाणून घेतले़ राजवाडे संशोधन मंडळातर्फे आलेल्या मान्यवरांचा सत्कार अध्यक्ष मदनलाल मिश्रा, कार्याध्यक्ष संजय मुंदडा यांनी केला़ यावेळी संचालक नंदलाल अग्रवाल उपस्थित होते़ कोरोनाच्या अनुषंगाने फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करुन भेटीचा उपक्रम राबविण्यात आला़ यावेळी उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले़ धुळ्यात कोविडचे काम करीत असताना राजवाडे संशोधन मंडळाला भेट देण्याचा योग आला़ जतन केलेली कागदपत्रे आणि इतर दुर्मिळ वस्तू पाहून खूप आनंद झाल्याचे डॉ़ सापळे यांनी सांगितले़
राजवाडे मंडळाला अधिष्ठातांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 10:27 PM