आनलाइन लोकमतधुळे : जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बुधवारी सकाळी शहरातील एका परीक्षा केंद्राला कमांडोच्या फौजफाट्यासह भेट देवूस सर्वच खोल्यांची पहाणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अचानक भेटीमुळे तेथील कर्मचाऱ्यांची काही प्रमाणात धांदल उडालेली होती.बारावीचा बुधवारी सकाळच्या सत्रात सायन्सचा रसायनशास्त्र व कॉमर्सचा आॅर्गनायझेशन आॅफ कॉमर्स अॅन्ड मॅनेजमेंट हे पेपर होते.सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकाºयांनी कमोंडोचा मोठा फोर्स मागवून घेतला. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांनाही तत्काळ सोबत येण्याच्या सूचना दिल्या. कुठे जायचे हे मात्र कोणालाच ठाऊक नव्हते. जिल्हाधिकाºयांच्या गाडीतच कर्मचारी बसले. गाडी सरळ एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयात गेली. कमोंडोच्या फौजफाट्यासह जिल्हाधिकारी केंद्रावर आल्याने कर्मचाºयांचीही धांदल उडाली. जिल्हाधिकाºयांनी महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत पेपर सुरू असलेल्या वर्ग खोल्यांना भेट देऊन पहाणी केली. भेट देत असतांना कोणाचीही तपासणी करण्यात आली नाही. या केंद्रात रेखावार जवळपास अर्धातास उपस्थित होते.
धुळे जिल्हाधिकाऱ्यांची परीक्षा केंद्राला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:39 AM
सोबत कमांडोचा बंदोबस्त
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांनी अचानक परीक्षा केंद्राला दिली भेटसोबत कमांडोंचा बंदोबस्त कर्मचाºयांची उडाली धांदल