आॅनलाइन लोकमतधुळे- जिल्हा परिषदेच्या ५१ गट व १०९ गणांसाठी मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मतदान सुरू झालेले आहे. थंडीतही सकाळपासून मतदानासाठी केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत.धुळे जिल्हा परिषदेच्या ५६ गट व ११२ गणांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिरपूर तालुक्यातील वाघाडी, कोडीद, पळासनेर, रोहिणी व धुळे तालुक्यातील लामकानी हे गट बिनविरोध झाले. तर वाघाडी,वाडी (ता.शिरपूर) व धाडणे (ता.साक्री) हे तीन गण यापूर्वीच बिनविरोध झालेले आहेत. त्यामुळे आता ५१ गट व १०९ गणासाठी मतदान होत आहे.गटासाठी १६४ व गणात ३२९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.दरम्यान मंगळवारी सकाळी ७.३० वाजेपासून मतदान सुरू झाले. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत. मतदारांमध्ये चांगला उत्साह दिसून येत आहे.
धुळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 11:11 AM