लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : ‘व्यंकट रमणा गोविंदा, लक्ष्मी रमणा गोविंदा’चा जयघोष करत शहरातील खोल गल्लीत असलेल्या बालाजी रथोत्सवाला रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सुरुवात करण्यात आली़ १३६ वर्षांची परंपरा रथोत्सवाला आहे़ या उत्सवात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत़ सकाळी मूर्तीचा अभिषेकदसरा सणाच्या दुसºया दिवशी धुळ्यातील बालाजी रथोत्सवाला प्रारंभ केला जातो़ रविवार १ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मूर्तीचा अभिषेक करण्यात आला़ अभिषेकानंतर दोन तास मूर्तीची पूजा सुरू होती़ नैवेद्य आरती करण्यात आली़ रथाच्या पहिल्या आरतीचा मान स्व़ बाबुलाल बालाराम अग्रवाल यांचे वारसदार कृष्णाबाई बाबुलाल अग्रवाल आणि त्यांच्या परिवाराला देण्यात आला़ कमलनयन बाबुलाल अग्रवाल, मंगलाबाई कमलनयन अग्रवाल, मयुरेश कमलनयन अग्रवाल, कल्पेश कमलनयन अग्रवाल, वर्षा मयुरेश अग्रवाल, उज्वला कल्पेश अग्रवाल, खुशी, योगिता, वैशाली, गोविंदा अग्रवाल यांना पहिल्या आरतीचा मान देण्यात आला़ या परिवाराच्या हस्ते आरती झाल्यानंतर रथोत्सवाला प्रारंभ करण्यात आला़ पारंपरिक मार्ग कायमसाडेअकरा वाजेच्या सुमारास रथोत्सवाला सुरुवात झाली़ बालाजी मंदिरापासून निघालेला हा रथ पुढे चौथी गल्ली, सन्मान लॉजपर्यंत आलेला आहे़ पुढे हा रथ , राजकमल टॉकीज, आग्रा रोडवरून सरळ महात्मा गांधी पुतळामार्गे नगरपट्टी, सहावी गल्ली, मुंदडा मार्केटकडून गल्ली नंबर ४ मार्गे राममंदिराकडून बालाजी मंदिर असा मार्गस्थ होईल़ मोगरीधारकांचा गौरवबालाजींच्या रथाला लावण्यात येणाºया मोगरीधारकांचे कसब अत्यंत शिस्तबद्ध व वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यामुळे मोगरीधारकांचाही मानाचे नारळ देऊन गौरविण्यात आले़ रुग्णसेवा कार्यरतबालाजी रथोत्सवात सहभागी होणाºया नागरिकांची संख्या लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास तातडीने उपचार व्हावा यासाठी रथोत्सवासोबतच रुग्णवाहिका सज्ज करण्यात आली आहे़ यात अत्याधुनिक सुविधांसह २० जणांचे पथक तैनात करण्यात आले होते़ दरम्यान, यावेळी भाविकांनी मुर्तीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे़ बालाजींचा जयघोष सुरु आहे़
व्यंकटा रमणा गोविंदाचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 3:27 PM
बालाजी रथोत्सव : पारंपारीक मार्गावर भाविकांची मांदियाळी
ठळक मुद्दे ‘व्यंकट रमणा गोविंदा, लक्ष्मी रमणा गोविंदा’चा जयघोष़ साडेअकरा वाजेच्या सुमारास रथोत्सवाला सुरुवात़ रथोत्सवाच्या पहिल्या आरतीचा मान अग्रवाल कुटुंबियांना मिळाला़