शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

व्यवस्थापकासह वेटरने लावला हॉटेल मालकाला चुना, ४ लाखांची फसवणूक

By देवेंद्र पाठक | Published: October 14, 2023 6:46 PM

देवपुरातील घटना : काउंटरमधून लांबविले जात हाेते वेळोवेळी पैसे

देवेंद्र पाठक, धुळे : व्यवस्थापक आणि वेटर यांनी आपापसात संगनमत करुन हॉटेलमधील रोजच्या हिशेबात फरक दाखवून सुमारे ३ ते ४ लाखांची रक्कम परस्पर गडप करण्याचा प्रकार चव्हाट्यावर आला. यात ३ ते ४ लाखांची फसवणूक झाली. हा प्रकार फेब्रुवारी २२ ते एप्रिल २२ या कालावधीत घडला. दरम्यान, हॉटेल मालक काळे यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

यावर चौकशीअंती देवपूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विद्यानगरीत राहणारे पद्मसिंग राजेंद्र काळे (वय ३७) यांनी देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, देवपुरातील दत्त मंदिर चौकात काळे यांच्या मालकीचे पृथ्वीराज नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये फेब्रुवारी २०२२ ते एप्रिल २०२२ या कालावधीत अमाेल नामदेव कोळी (वय ३५, रा. मोगलाई, साक्री रोड, धुळे) हा व्यवस्थापक म्हणून, तर हिरामण देविदास पवार (वय ५२, रा. कानुश्री मंगल कार्यालयजवळ, धुळे) हा वेटर म्हणून काम करत होता. या दोघांनी आपसात संगनमत करून वेळोवेळी हॉटेलच्या रोजच्या हिशेबात फरक दाखविला.

तसेच, वेटर हिरामण पवार याने कॅश काउंटरवर उपस्थित असलेले व्यवस्थापक अमोल कोळी याच्याकडे येऊन २० ते ५० रुपये सुट्टे देऊन त्या बदल्यात २०० ते ५०० रुपयांच्या चलनी नोटा घेऊन जात असे. अशा प्रकारे या दोघांनी हॉटेल मालक पद्मसिंग काळे यांच्या लक्षात आपला अपहार येऊ नये म्हणून हातचलाखी केली. वेटर पवार हे व्यवस्थापक अमोल कोळी याच्याकडे ग्राहकाचे बिल देऊन उर्वरित रक्कम ग्राहकाला परत देण्यासाठी जात आहे, असे भासवायचा. अशा प्रकारे अपहार करून दोघांनी मिळून हॉटेल मालकाची सुमारे ३ ते ४ लाखांत फसवणूक केली.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर पद्मसिंग काळे यांनी देवपूर पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. त्यानुसार मध्यरात्री साडेबारा वाजता भादंवि कलम ४०८, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ५०६ (२), ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस हेड कॉन्स्टेबल मोराणीस घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी