शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

जिल्ह्यात ८० हजार तरूणांना रोजगाराची प्रतीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 6:42 PM

कौशल्य विकास केंद्रात नोंद : रोजगारासाठी तरूणांचे पुणे, मुंबईत दरवर्षी स्थलांतर 

चंद्रकांत सोनार ।  लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  बेरोजगारी दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात दररोज बेरोगारांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. गेल्या दहा वर्षभर जिल्ह्यात ७५ हजार ५५० बेरोजगार तरूणांनी नाव नोंदणी केल्याची माहिती आहे. नोकरीच्या अपेक्षित संधी उपलब्ध होत नसल्याने रोजगारासाठी बेरोजगारांची पावले आता रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाकडे वळत आहेत. रोजगार कार्यालयात दरमहा सरासरी अडीच हजार बेरोजगार तरुण-तरुणी नोकरीसाठी नोंदणी करीत असून, दर महिन्यात यात वाढच होत आहे. दरवर्षी नोंदणीत होते वाढजिल्ह्यातील दरवर्षी हजारो युवक शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात फिरताना आढळतात. रोजगार मिळावा या हेतूने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात आपल्या नावाची नोंदणी करून नोकरीची प्रतीक्षा करतात. त्यामुळे हा विभागही सध्या हायटेक झाला आहे; पण सामान्य शेतकºयांच्या मुलापर्यंत रोजगार पोहोचत नसल्याचे चित्र आहे. शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. बेरोजगारी प्रश्न गंभीर जिल्ह्यात बेरोजगार युवकांच्या रोजगार निर्मितीकरिता कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. प्रत्येक वर्षी दहावी, बारावी व पदवी घेणाºया युवकांच्या संख्येसोबतच बेरोजगारीही वाढत असल्याचे दिसून आले आहे. तालुकास्तरावर घेतले जातात मेळावे जिल्ह्यातील बेरोजगारांची वाढती संख्या पाहता येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे रोजगार मेळावे घेऊन देखील बेरोजगारी आकडा अद्याप कमी झालेला नाही़ त्यामुळे बेरोजगारी प्रश्न गंभीर झाला आहे़ बेरोजगारांनी नोंदणी कार्डची वैधता संपल्यानंतर नुतनीकरण केले नाही. जिल्ह्यात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्रात  बेरोजगारांची नोंदत वाढ झाली आहे़

* असा आहे बेरोजगारीचा आकडा *दहावीत प्रथम क्षेणीत उर्त्तीण झालेल्या आतापर्यर्त २१ हजार २७० तरूणांची नोंदणी झाली होती. तर दुसºया श्रेणीत दहावीत उत्तीर्ण झालेल्या ३० हजार ६९२ तरूणांनी नोंदणी केली आहे़ पदवीका (डिप्लोमा) शाखेत अभियांत्रिकी १ हजार ५९२, शिक्षणशास्त्र पदवीका २ हजार ५४१ इतर शाखेतील पदवीधर १ हजार ९८४, आयटीआय पदवीका २ हजार ९८७, अंतरवासिका (अपे्रटिंस) प्रथम वर्षातील ६५६, तिसºया वर्षातील ७, पदवीधर कला शाखेतील ७ हजार १८४, विज्ञान शाखा १ हजार ७८४, वाणिज्य शाखा १ हजार ११७, अभियात्रिकी शाखा १ हजार ५४२, वैद्यकिय ३५, कृषी ६३, विधी ३३, शिक्षणशास्त्र पदवी १ हजार ७३२, व्यवस्थापन शाखा १२ इतर ३०८ असे एकूण ७५ हजार ५५० बेरोजगार तरूणांनी नोंदणी केली आहे़

चिंताजनक चित्र : बेरोजगार तरूणांच्या संख्येत दरवर्षी वाढ1 सात-सात वर्षापुर्वी दहावी तरूण-तरूणी उत्तीर्ण झाले की, उर्तीर्ण झाले की, उत्तीर्ण झाल्याची सनद घेऊन रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात केली जात होती़ तसेच १२ वी, पदवी, पदवीत्तर पूर्ण केलेले आपली नोंदणी करून घेत त्यातील अनेकांना सरकारी, निमसरकारी, खाजगी संस्थेत रिक्त जागा झाल्या की, पात्रतेनुसार रोजगारही मिळत असे, परंतू  सन २०१२ पासुन विभागाचे नाव बदलुन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्र असे करण्यात आले़ त्यामुळे बेरोजगारांना आॅनलाईन एम्प्लॉयमेंट नोंदणी करता येते़मात्र रोजगार मिळण्याची खात्री नाही़

2 महास्वयंम या संकेतस्थळावर १८ वर्षापुढील तरूणांना रोजगार मिळावा यासाठी घरबसल्या आॅनलाईन नोंदणी करता येवू शकते़ त्यामुळे  रोजगार नोंदणीचा दरवर्षी आकडा वाढत आहे़

3 एकीकडे बेरोजगार नोंदणीच्या संख्येत वाढ होत  आहे़ मात्र आतापर्यत किती जणांना रोजगार मिळाला याबाबत जिल्हा कौशल्य विकास विभागाकडे माहिती नाही़ 

 *  बेरोजगारीचा प्रश्न गंभीर *   सेवायोजन कार्यालयाची व्याप्ती वाढून रोजगार व स्वयंरोजगार असे करण्यात आले आहे. त्यामुळे बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचे कामदेखील रोजगार आणि स्वयंरोजगार कार्यालयाला करावे लागते. दरमहा बेरोजगारांना नोकरी मिळावी असे लक्ष्य आहे. मात्र नोकरी देणे किंवा भरती काढणे, उमेदवारांची निवड करणे हे सर्वस्वी संबंधित आस्थापनावर अवलंबून असते. त्यामुळे रोजगाराचे लक्ष्य असले तरी प्रत्यक्षात रोजगार देण्याबाबतचे अधिकार कार्यालयाकडे नसल्यामुळे रोजगाराचा प्रश्न चितेंत आहे़

* केंद्राकडून रोजगाराचा दावा *कौशल्य विकास, रोेजगार व उद्योजकाता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून पुणे, मुंबई, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये  रोजगार मिळाल्याची दावा केला आहे. विविध कंपन्यामध्ये जॉब प्लेसमेंट अंतर्गंत तरूणांना संधी देण्यात आली आहे़ तर तरी देखील बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकलेला नाही़ त्यामुळे  पुणे, मुंबई, नाशिक, गुजरात राज्यात तरूणांचे मोठ्या प्रमाणात स्थलातंर होते़ 

*असा आहे बेरोजगारीचा आकडा*

*शाखा नोंदणीची आकडेवारी*

दहावीत प्रथम क्षेणी उर्त्तीण २१ हजार २७०दहावीत दुसया श्रेणीत उत्तीर्ण  ३० हजार ६९२ डिप्लोमा शाखा १ हजार ५९२शिक्षणशास्त्र २ हजार ५४१ इतर शाखा १ हजार ९८४आयटीआय २ हजार ९८७अपे्रटिंस  वर्ष तील ६६३कला शाखा ७ हजार १८४विज्ञान  शाखा१ हजार ७८४वाणिज्य शाखा १ हजार ११७अभियात्रिकी शाखा १ हजार ५४२वैद्यकिय शाखा ३५कृषी शाखा ६३विधी शाखा  ३३शिक्षणशास्त्र  १ हजार ७३२व्यवस्थापन शाखा १२ इतर ३०८ एकूण ७५ हजार ५५० तरूणांनी नोंदणी केली आहे़ 

 

 

टॅग्स :Dhuleधुळे