लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील शिवतीर्थ ते दसेरा मैदान दरम्यान रेल्वे स्टेशनरोडवरील अतिक्रमण काढण्यासाठी मनपाने पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्त मिळावा यासाठी पत्र दिले होते. परंतु, शुक्रवारी पोलीस बंदोबस्त मिळू न शकल्यामुळे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रेल्वे स्टेशनरोडवरील १०३ अतिक्रमणधारकांना मनपाने नोटीस दिली होती. तत्काळ, येथील अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढावे, अन्यथा मनपा ते काढून घेईल, अशी नोटीस दिली होती. यासंदर्भात मनपाने स्टेशनरोडवरील व्यापारी, निवासी तथा धार्मिक स्थळांचे अतिक्रमण स्व:खर्चाने काढावे, अशी नोटीसही प्रसिद्ध केली होती. मनपाने दिलेल्या नोटिसीनंतर अतिक्रमणधारक लोकप्रतिनिधींनी मनपा आयुक्तांची भेट गुरुवारी घेऊन दिवाळीपर्यंत अतिक्रमण काढू नये, अशी मागणी केली होती. त्यामुळे मनपा प्रशासनातर्फे आता या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही कधी केली जाते? याकडे लक्ष लागून आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.
मनपाला पोलीस बंदोबस्ताची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:29 PM
रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमण: पोलीस प्रशासनाला पत्र; मनपाच्या कार्यवाहीक डे लक्ष
ठळक मुद्देस्टेशनरोडवरील अतिक्रमणधारक चिंतेत. दिवाळीनंतर कार्यवाही करण्याची मनपा प्रशासनाकडे मागणी. ऐन सणासुदीत बेघर होण्याची अतिक्रमणधारकांवर येणार वेळ