लोकमत न्यूज नेटवर्कधुळे- देशातील तरुण उद्योजकांना व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा हात देण्याचे दृष्टीने विना जामीन व विनातारण कर्जयोजनेची घोषणा केली़ दरम्यान बॅकेकडून या योजनांची उदिष्ठे पूर्ण होत आहे़ मात्र योजनांसाठी बॅकासहकार्य करत नसल्याने तरूण उद्योजकांना निराशा पत्करावी लागत आहे़ परिणामी याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे़ ग्रामीण भागातील तरुणांना कोणताही व्यवसाय करायचे म्हटले की मूळ अडचण येते ती भांडवलाची, कोणत्याही बँका वशिल्याशिवाय उभा करीत नाहीत, खाजगी सावकारी परवडत नाही. त्यामुळे अनेकदा मनात असूनही व तेवढी मनाची ,कष्ट करण्याची क्षमता असूनही नाईलाजाने मिळेल त्या नोकºया शोधाव्या लागतात. ही तरुणाईची, व्यवसाय करू पाहणाºया बहुतेकांची अनेक वर्षा पासूनची समस्या आहे. मुद्रा योजनेच्या जाहिरातीवर मोठ्या प्रमाणात भर दिला जातो. ही योजना जाहीर झाल्यापासून या वगाने बँकेत गर्दी करण्यास सुरुवात केली. परंतु बहुतेक बँकांनी सुरुवातीपासूनच अशा योजनेतील कर्ज देण्यास ना चा पाढा सुरु केल्याने मोजक्याच लाभार्थ्याना या योजनेचा लाभ दिला जातो़ नोकरी व व्यवसायासाठी मोठ्या शहरात स्थालांतर : शहराचा विकास न झाल्याने दरवर्षी पदवी घेऊन बाहेर पडणाºया तरूणांना हक्कांची धुळ्यात नौकरी मिळेल अशी आशा नसते़ शिवाय महागाईच्या तुलनेत नौकरीतून योग्य मोबदला मिळत नसल्याने तरूणांची निराशा होते़ म्हणून दरवर्षी विविध विषयात पदवी घेऊन पडणाºया तरूणांचे पुणे, मुंबई, सुरत, नाशिक आदी मोठ्या शहरात स्थलांतर होते़ मात्र धुळ्याचा औद्योगिक विकास झाल्यास तरूणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो़ यासाठी योजनांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे़मुद्रा योजनेबाबत जनजागृतीचा अभाव : देशातील तरुण उद्योजकांना व्यवसाय करण्याची संधी मिळण्यासाठी सरकारने मुद्रा योजनेतून पाठबळ दिले आहे़ विविध माध्यमातून योजनची जनजागृती देखील करण्यात येत़ मात्र आज ही शहरासह ग्रामीण भागातील तरूणांना योजनेचा लाभ कसा घ्यावा, अर्ज कुठे करावा, याबाबत माहीती नसल्याने आजही बरेच लाभार्थी आजही या योजनेपासून वंचित आहे़ मर्जीतल्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ: सुशिक्षीत बेरोजगारांना नवीन व्यवसाय, स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी बँकांकडून सहजासहजी अर्थसाह्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे शासनाने मुद्रा योजनेद्वारे हे कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच व्यवसाय वृद्धीसाठीही या योजनेतून कर्ज मिळू शकते. मात्र मुद्रालोन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. बºयाचदा तर बँकांकडून उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी बॅकाकडून मजीर्तील कर्जदारांनाच मुद्रालोन दिले जाते़ त्यामुळे कर्जवाटपाची आकडेवारीत वाढ दिसते मात्र वंचित लाभार्थी ही मोठ्या प्रमाणात दिसून येतात. दरम्यान सरकार व्याजाची हमी घेत असतानाही कर्जवाटपास बॅका टाळाटाळ करीत असल्याने तरूणांनी नाराजी व्यक्त केली आहे़ याबाबत प्रशासनाकडे तक्रार करून अद्याप न्याय मिळालेला नसल्याचे सांगितले़ अशी आहे मुद्रा लोनची आकडेवारी : २०१८-१९ या आर्थिक वर्षात सुमारे १ कोटी १५ लाख ४३ हजारांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे़ त्यात शिशु गटासाठी ९५.२५ उदिष्टे होते़ त्यापैकी ९०.६३ टक्के उदिष्टे बॅकांनी केले़ किशोर गटाला १२.३७ उदिष्टे ११.५१ उदिष्टे पूर्ण तसेच तरूण गटासाठी १३. ८३ टक्यापैकी १३.२८ टक्के उदिष्टे सहकारी, राष्ट्रीय, प्रादेशिक ग्रामीण वित्तीय बँका, संस्थांंनी पूर्ण केले आहे़