धुळे : शासनाकडून महापालिका हद्दीत वृक्षारोपणासाठी सुमारे ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मनपाकडून प्रभागनिहाय वृक्षसमिती गठीत करण्यात निर्णय बैठकीत घेण्यात आला़मनपाच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात वृक्षारोपणासाठी नियुक्त प्रभागनिहाय समिती प्रमुखांची बैठक घेण्यात आली. बैठकीला सहाय्यक आयुक्त विनायक कोते, तुषार नेरकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थितीत होते़शासनाने महापालिकेसाठी ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे़़ त्यासाठी मनपाकडून नियोजन केले जात आहे़ त्यासाठी आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशाने प्रभाग निहाय अधिकारी व कर्मचारी यांची समिती गठीत करण्यात आली आहे़ सद्यस्थितीत प्रभाग निहाय ११०० वृक्ष वाटप निश्चित केले आहे़ त्यासाठी प्रभाग निहाय अधिकारी समिती प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. समितीत प्रत्येक समिती प्रमुखांच्या अधिपत्याखाली ३ कर्मचारी नियुक्त केले आहे.फोटो अपलोडच्या सुचनावृक्ष जोपासणेसाठी त्या त्या भागातील नागरीकांना जबाबदारी देवून शपथपत्र घ्यावे तसेच वृक्ष लागवडी नंतर जी. आय. एस. टॅगव्दारे फोटो अपलोड करुन अहवाल सादर करावा अशा स्वरुपाच्या सुचना तथा आदेश बैठकीत देण्यात आलेत.सद्यस्थितीत शासनामार्फत लामकानी रोप वाटिका येथून सुमारे २०००० रोपे प्राप्त होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली़
वृक्षारोपणासाठी प्रभागनिहाय समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 10:05 PM