धुळे : महापालिका प्रशासनाकडून नव्याने खरीदी केलेल्या नव्या घंटागाड्यावर प्रशासनाचे लक्ष राहावे, यासाठी जीपीएस प्रणालीचा वापर केला जाणार आहे. याबाबत गुरूवारी स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले़ मनपाच्या घंटागाड्या कचरा संकलनासाठी नियमित येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढ होत होत्या़ तसेच नगरसेवक सुद्धा महासभेत कचरा संकलन विषयावर आक्रमकपणे भुमिका घेत होते़ जुना ठेक्याची मुदत संपल्यानंतर महापालिकेने यंदा शहरातील कचरा संकलनासाठी १७ कोटी ७८ लाख १६ हजार ९१४ रुपयाचा ठेका तीन वर्षासाठी नाशिक येथील एका खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला होता़ प्रत्येक ठिकाणचा कचरा उचलला जातो अथवा नाही, घंटागाड्या वेळेत पोहचतात किंवा नाही, त्यांच्याकडून कामचुकारपणा होता का? यासाठी महापालिका आरोग्य विभागाने जुन महिन्यापासुन नव्या ८९ व जुन्या १० अशा ८९ घंटागाड्या जीपीएस प्रणाली सुरू करणार आहे़ कामात पारदर्शकता तसेच कामचुकारपणा करणाया कर्मचायावर प्रशासनाचे लक्ष लागुन राहणार आहे़ *तक्रारींचा ओघ होणार कमीघंटागाड्यांना जीपीसएस प्रणाली बसविण्यानंतर प्रभागात घंटागाड्या येत नसल्याच्या तक्रारीवर महापालिकेला आळा घालता येवू शकतो़ जीपीएस प्रणालीचा वापरामुळे मनपाकडून निश्चित करण्यात आलेल्या प्रत्येक मार्गावरील कचरा संकलनाबाबत खात्री कराता येवू शकते़ *एका प्रभागात चार गाड्यानव्याने खरेदी करण्यात आलेल्या घंटागाड्याचे प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे़ त्यात १२०० घरांसाठी एक घंटागाडी व दोन कर्मचारी नियुक्त केले आहे़ शहरातील प्रभागनिहाय नकाशा तयार करून मनपा प्रशासनाने ठेकेदाराला सोपविला आला आहे़ नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महिन्यातून ३० दिवस घंटागाडी घरोघरी सेवा देणार आहे़ तसेच ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा टाकण्यासाठी देखील जनजागृती करणार आहे़ *प्रभागनिहाय मुकादमहद्दवाढीतील ११ गावातील कचरा संकलनासाठी १९ मुकादम नियुक्त करून त्यांच्यावर त्या-त्या प्रभागांची स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ नव्या घंटागाड्यासह मनपाची जुनी वाहने, ट्रॅक्टर, मोठ्या घंटागाड्या अशी ७४ वाहनांची मदत कचरा संकलनासाठी घेतली जाणार आहे़ गैरसोय टाळण्यासाठी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या घंटागाडया घरोघरी जावून कचरा संकलन करणार आहे. * तीस दिवस फिरणार घंटागाडी महिन्यातून ३० दिवस घंटागाडी दररोज सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ओला व सुका कचरा संकलन करणार आहे. कचरा संकलनासाठी नाशिक येथील ठेकदाराला ठेका देण्यात आला आहे़ १९ प्रभागासाठी ७९ गाड्या तर उर्वरीत जुन्या १० घंटागाड्या हद्दवाढीतील ११ गावे व लांब असलेल्या प्रभागांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्राकडून देण्यात आली होती़ *निर्णय विचाराधीन ओला व सुका कचरा विलिनीकरणासाठी मोहीम राबविणार आहे़ त्यासाठी वेस्ट कलेक्शन सेंटर उभारण्याचा निर्णय मनपाच्या विचाराधीन आहे़ इंदूर मनपाच्या धर्मीवर धुळ्यात सुका व ओला कचरा निर्मितीव्दारेस्वच्छता मोहीम राबविणार आहे़ कचरा जमा करणाºया महिलांची बैठक घेण्यात आली आहे़. दरम्यान गुरूवारी होणाया मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत याविषयावर चर्चा होणार आहे़
1 घरातील, दुकानांमधील कचरा सर्व्हिस लाइनमध्ये किंवा रस्त्यावर न फेकता मनपाच्या वाहनात जमा केल्यास सार्वजनिक ठिकाणी साचणाºया कचºयाची समस्या राहणार नाही, या उद्देशातून मनपा प्रशासनाने ७९ नवीन वाहनांची खरेदी केली. या वाहनांसाठी प्रशासनाने स्वयंरोजगार तत्त्वावर खासगी चालकांची नियुक्ती केली. प्रभागांचे क्षेत्रफळ वाढल्यामुळे प्रत्येक भागासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये नवीन प्रभागांचा समावेश असून, वाहनचालकांना स्वच्छता दूत म्हणून ओळखले जाते.
2 कचरा न उचलणे, तो पडून राहणे अशा अनेक समस्यांना मनपाला तोंड द्यावे लागत होते. या समस्येवर मात करून घंटागाड्यावर देखरेख ठेवण्यासाठी मनपाने जीपीएस प्रणालीचा आधार घेतला.
3 जीपीएसव्दारे प्रत्येक घंटागाडीवर एक चीप बसवली आहे. तिच्या माध्यमातून दिवसभरात संबधित घंटागाडी कुठे, कोणत्या भागात, किती किमी फिरली, याची माहिती एका क्लिकवर मिळेल़